Weather update : हवामान खात्याच्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्टर्बनच्या प्रभावामुळे देशात व राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पडणार पाऊस. अनेक राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव कमी झाला असून, पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संपूर्ण माहिती कोठे पडणार पाऊस. कसा असणार येणाऱ्या दिवसांमध्ये पावसाचा अंदाज.महाराष्ट्र सह अनेक राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बनच्या प्रभावामुळे वातावरणामध्ये बदल दिसून आला आहे.
अनेक राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले आहे ,व पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील एक दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली आहे. तू येणाऱ्या 48 तासांमध्ये अशीच परिस्थिती राहणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस :
हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्र मध्ये अनेक जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस. तापमानामध्ये घट झाली असून विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाच्या तुरळक सरी दिसून येणार आहेत. पुणे ,कोल्हापूर ,नाशिक ,जळगाव, अहमदनगर ,बीड ,भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.उत्तर भारतात देखील पावसाची शक्यता आहे. ज्यामध्ये नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश ,अशा अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या 48 तासांमध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी कडाकेची थंडी सह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
MID ने या तारखेला वर्तवली पावसाची शक्यता :
9,10,11, या दिवशी उत्तराखंड ,पंजाब ,महाराष्ट्र ,गुजरात, मध्य प्रदेश ,या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर भारताचे अनेक भागात हलकी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून त्यांचे शेतकरी पिक काढली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या शेतातले पीक काढून घेतली पहिजे .