Weather Update: राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाका; एप्रिल महिन्यातील राज्यात होणार अवकाळी पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याच्या हवामानामध्ये गेल्या दोन दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अशातच पुन्हा एकदा 7 एप्रिल तर राज्यामध्ये ढगाळ वातावरणाचा काही ठिकाणी अवकाळी पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. ( Weather Update )

दोन दिवसापासून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केलेले आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या प्रमाणात हातबल झालेला आहे. सध्या बंगाल उपसागरातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यामध्ये मराठवाडा व विदर्भ पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

Also read this | तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या बाजार समितीमध्ये मिळत आहे दहा हजार रुपये भाव

या राज्यामध्ये पावसाची शक्यता Weather update

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. दिवसा उन्हाचा पारा खूप वाढत असून रात्रीच्याला पावसाचे वातावरण तयार होत असताना नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यामधील काही भागात अचानक आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज उत्तरेकडील राज्यामध्ये पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगितले आहे.

Click here to know Marathi news

देशभरामध्ये तीन एप्रिल नंतर पावसाचे वातावरण काय निवळनार असल्याचे सांगितले आहे. तसेच 7 एप्रिल नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये वातावरणात बदल पाहायला मिळणार आहे. तर देश पातळीवर अन्य राज्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

राज्यामध्ये तापमानात वाढ Temperature rise in the state

राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांना मोठा झळा सहन करावा लागत आहे. तसेच विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये उंच अंकी तापमानाची नोंद पहायला मिळाली. मागील 24 तासांमध्ये राज्यातील अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी उंचांकी म्हणजे 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे.

तसेच विदर्भामधील जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम असून तापमानाचा पारा 40°c अधिक नोंदवला जात आहे. विदर्भामधील वर्धा, यवतमाळ, नागपूर, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये 40° पेक्षा अधिक तापमान आहे. तर मराठवाड्यामधील बीड, परभणी या जिल्ह्यांसह दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 40°c अधिक नोंदवले गेले आहे. यामुळे नागरिकांना उन्हाच्या मोठ्या प्रमाणात झळा सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खांदण्यासाठी मिळणार, 100 टक्के अनुदान..!

Leave a Comment