Weather Update : उत्तर भारत मध्ये काही राज्यात हवामान हळूहळू बदलत आहे. येणाऱ्या चार दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतामध्ये प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इतर भागांमध्ये हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. व इतर काही भागांमध्ये जसे की ओरिसा आणि आसपासच्या प्रदेशात वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा दक्षिण कर्नाटक ते तमिळनाडू पर्यंत तयार झालेल्या ढगाळ वातावरण कायम असणार आहे.
तापमानामध्ये झाली मोठी वाढ :
दक्षिण महाराष्ट्र बरोबरच विदर्भ मराठवाडा पट्ट्यात सध्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे व ते आता काय राहणार आहे. ज्या कारणाने कमल तापमानात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे दुपारच्या वेळी रखरख उन पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांमध्ये राज्यांमध्ये कमल तापमानाचा पार हा 40°c कडे झेप घेताना दिसला आहे. Weather Update
यामध्ये प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर या ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त 39.4 अंश सेल्सियस तापमान पाहायला मिळाले आहे . या उलट मागील 24 तासांमध्ये राज्यातील किमान तापमानातील सर्वात भागांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र मध्ये उन्हाची ताप :
महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील तापमान हे 38 अंशापर्यंत वाढले आहे ज्या कारणाने अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडका वाढलेला दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, पालघर ,असे जिल्हे वगळता बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंशाहून अधिक झाले आहे. यामुळे राज्यांमध्ये प्रचंड कोणाची ताप पाहायला मिळत आहे.
येणाऱ्या दिवसांमध्ये उन्हाचा पारा वाढू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
या उलट येणाऱ्या दिवसांमध्ये उत्तरेकडील जवळपास सात राज्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील पश्चिम वाऱ्यांच्या झोतामुळे अवकाळी पाऊस झाला होता. व आता देखील पश्चिम वाऱ्यांच्या झोतामुळे पाऊस होण्याची ही तिसऱ्यांदा वेळ आहे. मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात तर तिसऱ्या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता.
हे पण वाचा: पी एम किसान चा सोळावा हप्ता मिळाला नाही तर काय करावे? पहा सविस्तर माहिती
2 thoughts on “या राज्यामध्ये पावसाची दाट शक्यता, वाऱ्यासह गारपीठ होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने दिली माहिती”