Turmeric Rate: महाराष्ट्र राज्यातील हळदीच्या भावामध्ये झाले बदल; जाणून घ्या आजचे महाराष्ट्र राज्यातील बाजार भाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Turmeric Rate: महाराष्ट्र राज्यातील बरेच शेतकरी हळदीचे उत्पादन हे घेत असतात. पण, अशातच हळद या पिकाला भाव काय मिळतो? व या हळदीचे उत्पादन कशाप्रकारे महाराष्ट्रातील शेतकरी घेत असतात? या संदर्भातील माहिती यामध्ये दिलेली आहे, ती तुम्ही संपूर्ण पाहून घ्यावी.

या जानेवारी महिन्याच्या शेवटी हळदीच्या भावामध्ये वाढ होण्यास आता सुरुवात झालेली आहे. व त्यानुसार मागील गेल्या 15 दिवसापासून ते 3 आठवड्यांपासून या हळदीचे बाजार भाव एका स्थिर पातळीवरती टिकून असल्याच आपल्याला पाहायला भेटत आहे.

पण, यावर्षीचा हळद हा हंगाम सुरू होऊनच जवळपास एक महिना होऊन अधिकचा काळ आता उलटला आहे. व सांगली आणि हिंगोली या दोन्ही प्रमुख हळदीच्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळदीची आवक ही होत आहे.

हे पण वाचा, राज्य सरकारची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज होणार माफ!

असे असतानाही अधिकच्या आवकचा यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम भावावर झालेला दिसून येत नसून यामध्ये हळदीच्या बाजारामध्ये झालेली भाववाढ ही आता कायम आहे.Turmeric Rate:

पहा आजचे महाराष्ट्र राज्यातील बाजार भाव !

  • हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीची आवक ही 1500 क्विंटल झालेली असून, जास्तीत जास्त 14520 ते कमीत कमी 11990 रुपये तर यामध्ये सरासरी 13255 रुपये प्रत्येक क्विंटल प्रमाणे भाव हा भेटला आहे.
  • मुंबई बाजार समितीमध्ये हळदीची आवक 298 क्विंटल झालेली असून, जास्तीत जास्त 20 हजार ते कमीत कमी 15 हजार रुपये तर यामध्ये सरासरी 17500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव भेटला आहे.
  • हिंगोली जिल्ह्यामधील बसमत या बाजार समितीमध्ये हळदीची आवक 1126 क्विंटल झालेली असून, जास्तीत जास्त 15000 ते कमीत कमी 8505 रुपये तर यामध्ये सरासरी 11752 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव भेटला आहे.
  • नांदेड या बाजार समितीमध्ये हळदीची आवक ही 568 क्विंटल एवढी झालेली असून, जास्तीत जास्त 14 हजार 495 ते कमीत कमी 10 हजार 495 रुपये तर यामध्ये सरासरी 12505 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव भेटला आहे.

राजापुरी हे ठिकाण हळदीसाठी अतिशय प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे.

सांगली या बाजार समितीमध्ये आज राजापुरी हळदीची आवक 2084 क्विंटल एवढी झालेली असून, जास्तीत जास्त 25 हजार आठशे ते कमीत कमी बारा हजार रुपये तर यामध्ये सरासरी 18 हजार 900 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव भेटला आहे.

हळदीचे भाव हे आता तेजीतच राहणार.

या हळद पिकाच्या हंगामाच्या महिनाभरानंतर आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ही आवक होत असून, यामध्ये केवळ महाराष्ट्र राज्यातूनच नाही तर शेजारील कर्नाटक या राज्यांच्या काही भागांमधूनही या हळदीची वाहने आता महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होत आहेत.

पण, ही आवक वाढलेली असली तरी या बाजारामध्ये हळदीला ही मागणी देखील आहे. म्हणून बाजार समित्यांमध्ये दोन्ही सकाळच्या व दुपारच्या सत्रामध्ये लिलाव हा होतच आहे. आणि सध्या बाजारामध्ये उच्च गुणवत्तेची हळद ही येत आहे.

पण, परिणामी यात व्यापाऱ्यांमध्ये देखील खरेदी करण्यास चढावढ निर्माण होत आहे. यामधूनच शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळण्यास फायदा होत असल्याचं, व्यापारी वर्गामधून सांगितले जात आहे. व सध्याची एकूण परिस्थिती ही पाहता आगामी काळामध्ये देखील या हळदीचे भाव आता तेजीमध्येच राहणार, असल्याचे हळद बाजारातील जाणकारांकडून व व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

2 thoughts on “Turmeric Rate: महाराष्ट्र राज्यातील हळदीच्या भावामध्ये झाले बदल; जाणून घ्या आजचे महाराष्ट्र राज्यातील बाजार भाव !”

Leave a Comment