Tur Rate : तुरीचे दरा मध्ये झाली विक्रम वाढ..! तुरीचे दरा मध्ये तब्बल 1,800 रुपयांची वाढ, तुरीचे तर सध्या 10,000 रुपये पार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Rate : ज्या शेतकऱ्यांनी यंदा आपल्या शेतामध्ये तुरीचे पीक घेतले आहे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तूर दरामध्ये झाली मोठी वाढ, तुरीचे दर तब्बल 1,800 रुपयांनी वाढले. तूर हे पीक महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र ,व इतर काही जिल्ह्यांमध्ये उत्पादित केले जाते व एक मुख्य पीक म्हणून उत्पादित केले जात आहे.

या विभागामध्ये तूर लागवडीत क्षेत्र हे विशेष उल्लेखनी असते. या विभागातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदी बातमी समोर आली आहे. म्हणजे तुरीचे बाजारभाव मध्ये चांगली वाढ झाली आहे. तज्ञ लोकांच्या माहितीनुसार अवकाळी पावसामुळे त्याचप्रमाणे गारपिटीमुळे तुरीच्या पिकावर विपरीत परिणाम झालेला आहे. या कारणे तुरीचे उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे.

यामध्ये आता प्रक्रिया उद्योगात तुरीची मागणी वाढलेली दिसून येत आहे. सध्या बाजारपेठ मध्ये तुरीची मागणी अधिक आणि आवक कमी असे दृश्य पाहायला मिळाले आहे. या कारणामुळे जेव्हा कोणत्याही मालाला मागणी जास्त असते त्या स्थितीमध्ये त्या मालाला भाव जास्त मिळतो.

याच कारणामुळे सध्या तुरीच्या बाजारभावामध्ये तुरीच्या भावाने आता 10,000 टप्पा गाठला आहे. काही ठिकाणी तर याहून आधी की भाव मिळत आहे, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 9200 ते 10,100 रुपये प्रति क्विंटल या दराने तुरीला खरेदी केली जात आहे.Tur Rate

मागील महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये आपण पाहिले की तुरीचे दर 7500 ते 8500 रुपये प्रति क्विंटल होते. यामध्ये आता बदल होऊन तुरीचे भाव मध्ये सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल मागे वाढ झाली आहे. या कारना मुळे सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांमध्ये घट ही सध्या विक्रमी दरामुळे भरून निघत आहे अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीला 9,500 ते 10,200 रुपये सरासरी दर मिळत आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला नऊ हजार पाचशे रुपये दे दहा हजार 150 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेगाव बाजार समितीमध्ये तुरीला नऊ हजार रुपये ते नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्याचप्रमाणे अमरावती बाजार समितीमध्ये तुरीला नऊ हजार दोनशे ते नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर मिळत आहे.

हे पण वाचा: शिंदे सरकारची नवीन योजना..! 65 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये मिळणार

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा