Tur Rate: तुरीच्या भावात झाली घसरण; पहा आजचे महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Rate: महाराष्ट्र राज्यामध्ये तुरीला भाव हा भरपूर प्रमाणे होता. यामुळे शेतकरी आपल्या तुरीचे पीक हे चांगलेच फायद्याचे ठरले असल्याचे सांगत आहेत. पण, आता ज्या शेतकऱ्यांनी तूर अजून मोंढ्यामध्ये विकली नाही अशा शेतकऱ्यांना आता तुरीच्या भावांमध्ये फारच तोटा घावा लागतोय. कारण, आता महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजार भाव हे घसरलेले पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्यातील तुरीच्या भावामध्ये आज काहीशी घसरण झालेली दिसत आहे. अकोला येथे तुरीचा भाव हे 10800 रुपयांपर्यंत गेले होते. पण, आज अकोला बाजार समितीत याच तुरीचा भाव 2995 क्विंटला एवढी आवक झाली असून, यामध्ये कमाल 10455 ते किमान 8700 रुपये, तर यामध्ये सरासरी 9650 रुपये प्रति क्विंटल पर्यंतची घसरण यामध्ये नोंदवली गेलेली आहे.

तर राज्यातील आज दुधनी सोलापूर जिल्ह्यातील या ठिकाणी तुरीला सर्वात जास्त 10560 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. म्हणून राज्यातील तुरीच्या भावामध्ये सध्या काहीसा चढउतार आपल्याला दिसत आहे.

सर्वात जास्त भाव हा कुठे आहे ?

सोलापूर जिल्ह्यातील दुधनी या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये आज 291 क्विंटल आवक झाली आहे. आणि कमाल 10560 ते किमान 900 रुपये तर सरासरी 9880 रुपये,

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर बाजार समितीमध्ये आज 26 क्विंटल एवढी आवक झालेली होती. कमाल 10500 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 10100 रुपये,

परभणी जिल्ह्यातील शेलु बाजार समितीमध्ये आज 664 क्विंटल आवक झालेली होती. कमाल 10500 ते किमान 900 रुपये तर सरासरी 9900 रुपये,

हे पण वाचा: शेतकऱ्यांचे खात्यात 12 हजार रुपये होणार जमा..? कृषिमंत्री यांनी दिले उत्तर

तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज 114 क्विंटलआवक झाली असून कमाल 10415 ते किमान 9500 रुपये, तर सरासरी 9660 रुपये,

नागपूर बाजार समितीमध्ये 4618 रिंगटोन झाली होती, कमाल 10411 ते किमान 9200 रुपये तर सरासरी 10108 रुपये,

वाशिम बाजार समितीमध्ये आज 3000 झाली होती, कमाल 10400 ते किमान 9100 रुपये तर सरासरी 9500 रुपये,

यवतमाळ बाजार समितीमध्ये आज 668 क्विंटल झाली होती, कमाल 10400 ते किमान 9200 रुपये तर सरासरी 9800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

आणि त्याच प्रमाणे कारंजा (वाशिम) बाजार समितीमध्ये आज 3500 क्विंटल झाली असून, तेथील कमाल 10350 ते किमान 8900 रुपये तर सरासरी ही 9960 रुपये,

अमरावती बाजार समितीमध्ये आज 12972 क्विंटल झाली होती, कमाल 10300 ते किमान 9200 रुपये, तर सरासरी 9750 रुपये,

दिग्रस (यवतमाळ) बाजार समिती आज 395 क्विंटल झालेली असून कमाल 10300 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 9935 रुपये,

चिखली (अमरावती) बाजार समितीमध्ये आज 664 क्विंटल आवक झाली होती, कमाल 10200 ते किमान 8900 रुपये तर सरासरी 9550 रुपये भाव मिळाला आहे.

याशिवाय, मालेगाव, मूर्तिजापूर, वणी, पालम, आष्टी, छत्रपती संभाजीनगर, जामखेड, करमाळा या बाजार समितीमध्ये या तुरीला 10 हजारांच्या वरती भाव कायम आहे. तर अन्य बाजार समितीमध्ये तुरीचा भाव हा 10 हजारांच्या खाली असल्याचे आता पाहायला मिळत आहे.Tur Rate:

अशाच शेती संदर्भातील माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्विंटल मागे 300 ते 350 रुपयांची घट

गेल्या काही दिवसांपासून या तुरीच्या भावामध्ये सातत्याने वाढ पाहायला आपल्याला मिळत होती. पण, आज मात्र, महाराष्ट्र राज्यातील काही ठिकाणी तुरीचे भाव 300 ते 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे घसरले आहे. यामुळे आज झालेल्या घसरणीनंतर तुरीचे भाव पुन्हा उसळी घेणार का ? किंवा मग भावामध्ये झालेली ही घसरण कायम राहणार का ? हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.

1 thought on “Tur Rate: तुरीच्या भावात झाली घसरण; पहा आजचे महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव !”

Leave a Comment