Tur Rate: यावर्षी सर्व शेतकऱ्याने तुरीचे उत्पन्न चांगल्या प्रकारे काढलेले आहे. तुरीच्या भावाला सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव भेटल्याने शेतकरी हे खुश झालेले आहेत. पण याच तुरीचे भाव आता अजून जास्त वाढतील का ? अशी आशा बाळगळून शेतकरी अजून बसलेले आहेत. तर याच तुरीच्या भावाबद्दल ची माहिती आपण यामध्ये जाणून घेऊया.
शेतकरी हा शेतीमध्ये चांगल्या प्रमाणात मेहनत करतो. आणि ही मेहनत केल्यानंतर उत्पन्नही चांगले काढतो. परंतु, उत्पन्न काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाला सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव मिळणार हे गरजेचं असतं,
त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती ही कशी असायला हवी किंवा येत्या काळामध्ये तुरीचे भाव हे आणखीन वाढू शकतात का? याची माहिती या लेखात दिलेली आहे.
तर यावर्षी असा विचार केला जातो, की सोयाबीन आणि कापूस यांसारखी पिके शेतकऱ्यांना परवडणार नाहीत. म्हणून, त्याचा भाव बघितला असता तर शेतकऱ्यांचा शेतीवर केलेला खर्च सुद्धा हा निघाला की नाही असा प्रश्न पडलेला असता. परंतु आता थोड्या प्रमाणामध्ये तुरीला भाव मिळाल्याने तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. Tur Rate:
तर तुरीच्या भावाला वाढ होण्याचे नेमके कारण काय ?
शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की, तुरीच्या भावाला वाढ होण्याचे नेमकं कारण काय आहे. महिन्यापूर्वी विचार केला असता तर तुरीच्या भावामध्ये घसरण झालेली होती. कारण भारत देशामध्ये मोझंबी मधील दोन कंपन्याकडून या भारत देशातील तूर निर्यात करण्यात येते. पण यावर्षी तूर निर्यातीच्या प्रश्नावर भांडण असल्यामुळे आतापर्यंतची भारतामध्ये तूर निर्यात करण्यात आलेले नाही. यामुळे तुर निर्यात दोन कंपन्याकडून न झाल्यामुळे देशातील तुरीचे भाव हे वाढले आहेत.
हे पण वाचा: वंदे भारत या संदर्भातील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता या नवीन मार्गावर धावणार.
मोझांबिक मधून तूर निर्यात ही इतर रखडलेली आहे. पण येणार असलेली तूर दीड ते दोन टनाच्या दरम्यान असल्याचे सांगितले गेले. पण, तूर भारतामध्ये आली असती तर भारतातील तुरीचे भाव हे मोठ्या प्रमाणावर घसरले असते. परंतु एवढ्या प्रमाणात दूर ही देशात आयात न झाल्याने देशातील तुरीच्या भावात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
यामध्ये सांगायचे झाले तर, देशातून आयात न झाल्याने हे तूर उत्पादक शेतकरी यावर्षी मालामाल होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात दूर आहे, असे शेतकऱ्यांना तुर चांगली आवक करून देईल, सध्याच्या स्थितीमध्ये नऊ हजारापासून ते दहा हजारापर्यंत चा तुरीला भाव मिळत आहे. आणि येत्या काळामध्ये सुद्धा आणखीन तुरीचे भाव वाढण्याची शक्यता अभ्यासकांच्या मते यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे.
अशाच तुरीच्या भावासंदर्भातील माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
तर आज आपण या लेखामध्ये तुर भाव 2024 संदर्भातील महत्त्वपूर्ण अंदाज हा जाणून घेतलेला आहे. अशी माहिती शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्यामुळे तुमच्या जवळच्या शेतकरी बांधवांना शेअर करण्यास विसरू नका.