तूर आणि सोयाबीन बाजारभावा मध्ये मोठी घसरण, आजचे बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Rate & Soybean Rate | सध्या तुरीची आवक जास्त असल्यामुळे तुरीचे भाव मध्ये घसरण दिसून आली आहे. आपल्याला माहित आहे की जेव्हा- जेव्हा आवक जास्त होते तेव्हा भाव कमी होतो . सध्या बाजार समितीमध्ये तूर व सोयाबीन ची आवक जास्त आहे या कारणाने बाजारभावामध्ये तुर व सोयाबीनचे भाव स्थिर आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी तुरीला चांगला बाजार भाव भेटत होता. तुरीला दहा हजारावर केलेला भाव पुन्हा खाली येऊ लागला आहे. सोयाबीन अजूनही हमीभावापेक्षा कमी दरामध्ये खरेदी केली जात आहे. आजचे बाजार भाव पाहता तुरीला 9 हजार रुपये प्रति क्विंटल, तर सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव मिळाला आहे.

हे पण वाचा : एफडीवर मिळवा 8.40% व्याजदर या सरकारी बँका देत आहेत जास्त परतावा

Tur Bajar Bhav Today/आजचे तूरीचे बाजार भाव :

काल रविवार असल्यामुळे अनेक बाजार समिती बंद होत्या, त्यामुळे आज बाजार समितीमध्ये जास्त मालाची आवक होत आहे. सिल्लोड बाजार समितीमध्ये आज तुरीला प्रति क्विंटल 8,800 रुपये ते सरासरी 8,900रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे.

देवणी बाजार समितीमध्ये तुरीला आज 9,600 रुपये ते सरासरी 9,700 रुपये इतका दर मिळाला आहे. वरोरा बाजार समितीमध्ये लाल तुरीला 7,700 रुपये इतका दर मिळाला आहे,सरासरी 8,200 रुपये दर मिळाला आहे. जळकोट बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक दर पाहिला मिळाला आहे 9,900 रुपये ते सरासरी 9,800 रुपये इतका तर पाहायला मिळाला आहे. मेंढाळ बाजार समितीमध्ये तुरीला 8,000हजार चारशे ते 8,800 रुपये दर मिळाला आहे.

Soybean bajar bhav today / सोयाबीनचे आजचे बाजार भाव :

आज सिल्लोड बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,400 रुपये दर मिळाला आहे. जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,300 रुपये दर मिळाला आहे. वरोरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,100रुपये ते सरासरी 4,200रुपये दर मिळाला आहे. सिंदखेड राजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,600 रुपये ते सरासरी 4,400 रुपये दर मिळाला आहे. देवणी बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4,400 रुपये ते 4900 रुपये दर मिळाला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेची माहिती लवकरात लवकर मिळेल

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

2 thoughts on “तूर आणि सोयाबीन बाजारभावा मध्ये मोठी घसरण, आजचे बाजार भाव”

Leave a Comment