Success Story: साकेश गोर यांनी 28 लाखाची नोकरी सोडून केला देशी कोंबड्याचा व्यवसाय. आपण अनेकदा पाहिले आहे की अनेक तरुण त्यांची नोकरी सोडून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. याचप्रमाणे अनेक तरुण वेगवेगळ्या व्यवसाय करीत आहेत, आज आम्ही तुम्हाला असेच एक तरुणाबद्दल माहिती सांगणार आहोत. हैदराबाद मध्ये एका तरुणाने इंजिनिअरिंगची नोकरी सोडून देशी कोंबड्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
या तरुणीने प्रथम आपली शिक्षण आयआयटी (IIT ) मधून पूर्ण केले व कठोर अभ्यासानंतर चांगली नोकरी मिळवली . पण या तरुणीने इथेच न थांबता यशाचा पाठलाग सोडला नाही. व तोच तरुण आज कंट्री चिकन कंपनीचे मालक बनले आहे . साकेश गोरे यांनी भारतातील सर्वोच्च अभियांत्रिका संस्था आयआयटी (IIT) मधून त्यांचे शिक्षण पूर्ण करून पुढील नोकरी करीत त्यांना 28 लाख रुपयांची पॅकेज मिळाली होते .
पण त्यांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायचे होते , अशीच संधी शोधत होते. व अशातच त्यांना दोन मित्रांनी साथ मिळाली एक म्हणजे हेंबर रेड्डी आणि मोहम्मद समीउद्दीन . हेंबर रेडी यांना सुद्धा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा होता. व ते त्याबाबत माहिती गोळा करीत होते, यावेळी त्यांची गोर आणि समयुद्दीन यांच्याशी भेट झाली. यावेळी तिघांनी कुक्कुटपालन ऐवजी जर कोंबडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला तर असा विचार केला व त्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबडी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.Success Story
70 लोकांना दिला रोजगार :
यानंतर यांनी हैदराबाद मधील फुकटपल्ली आणि प्रगती नगर येथे भारतामधील पहिले देसी चिकन रेस्टॉरंट उघडले. वया रेस्टॉरंट मध्ये त्यांनी सत्तर लोकांना काम दिले. अशाच प्रकारे त्यांनी दक्षिणेकडी राज्यांमधील पंधरा हजार पोल्ट्री उत्पादकांशी संपर्क साधला असून त्यांच्याकडून स्थानिक कोंबडीचे पिल्ले शेतकऱ्याकडून बाजारभावाने खरेदी करण्यास सुरुवात केली.
शेतकऱ्यांना मिळतोय चांगला दर :
शेतकऱ्यांना अतिशय उत्तम दर देऊन कोंबडी व अंडी खरेदी केली जात आहे. त्यांनी अनेक राज्यांमध्ये त्यांची नेटवर्क तयार करून 15000 पेक्षा पोल्ट्री फार्म सोबत व्यवसाय करीत आहेत. व ते या पोल्ट्री फार्म मालकांना चांगला दर देऊन त्यांच्याकडून देशी कोंबड्या व अंडी घेत आहेत.
हे पण वाचा : कुसुम सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी जाहीर, यादी मध्ये तुमचे नाव पहा
1 thought on “Success Story: 28 लाखाची नोकरी सोडून तरुणांने केला कोंबड्याचा व्यवसाय..! दिला अनेक जणांना रोजगार , कोटीमध्ये वार्षिक उत्पन्न”