Reshim Udyog: शेतकऱ्यांची ओढ तुती लागवडीकडे , ‘महारेशीम अभियानाला’ शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद 801 एकर क्षेत्रावर तुती लागवडीसाठी नोंदणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reshim Udyog: भारतामध्ये सध्या आधुनिक शेतीकडे शेतकरी जास्त लक्ष देत आहेत. त्यामध्ये आता महा रेशीम अभियाना अंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, रेशीम विभागाकडे तब्बल 801 एकर वरती लागवडीसाठी नोंदणी केली,पहा संपूर्ण माहिती .

महारेशीम अभियान 2024 अंतर्गत हिंगोली व परभणी या दोन्ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 801 एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील 443 एकर व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 358 एकर जमीन नोंदणीचा समावेश झाला आहे. फक्त या दोन जिल्ह्यातच रेशीम विभागाने तुती लागवड नोंदणीचे उद्दिष्ट आतापर्यंत पूर्ण केले आहे.

काही कारणास्तव कृषी विभाग व ग्रामपंचायत विभागाकडे तुती लागवडीसाठी नोंदणी झाली नाही अशा परिस्थितीत उद्दिष्ट कागदपत्रावरच आहे. व आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तूती रोप वाटिका तयार करण्याची कामे सुरू झाली आहेत. येणाऱ्या जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी रोपे उपलब्ध होणार आहेत. असे रेशीम विभागाच्या काही सूत्रांकडून माहिती सांगण्यात आली आहे.

सध्या शेतकरी बदलते हवामान परिस्थिती मुळे पारंपारिक शेती पिकाच्या उत्पादनाची जोखीम कमी करून आधुनिक आधुनिक शेतीकडे जास्त लक्ष केंद्रित करीत आहेत. यामुळे शेतकरी शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम शेतीकडे पाऊल उचलले आहे. रेशीम उद्योगासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती व तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने हे महारेशीम अभियान राबविण्यात आले आहे.Reshim Udyog

या नोंदणीसाठी महरेशीम अभियानाने नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान नोंदणी प्रक्रिया सुरू होती. महारेशीम अभियानामध्ये परभणी जिल्ह्यातील 1100 एकर व हिंगोली जिल्ह्यातील 750 एकर असे दोन्ही मिळून 1850 एकर तुती लागवडीसाठी नोंदणीचे उद्दिष्ट होते.

परभणी जिल्ह्यामध्ये 618 एकर तूती लागवड :

परभणी जिल्ह्यातील रेशीम विभाग आतापर्यंत 350 एकर व कृषी विभागाला 400 एकर जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागाला 350 एकर असे एकूण 1100 एकर तुती लागवड नोंदणीचे उद्दिष्ट होते. परंतु यामध्ये रेशीमगाकडे 443 एकरवर तुती लागवडीसाठी शेतकरी नोंद केली आहे. आतापर्यंत कृषी विभागाकडे व ग्रामपंचायत विभागाकडे कसल्याही प्रकारची नोंद झाली नाही. परभणी जिल्ह्यामध्ये जुनी व नवीन मिळून आतापर्यंत 579 शेतकऱ्यांकडे 618 एकरवर तुती लागवड आहे.

हिंगोली जिल्ह्यात 400 तुती लागवड :

हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील रेशीम विभागाला 250 एकर ,व कृषी विभागाला 300 एकर जिल्हा परिषद अंतर्गत, ग्रामपंचायत विभागाला 200 एकर असे एकूण 750 एकर तुती लागवड उद्दिष्ट होते. पण केवळ यामध्ये रेशीम विभागा अंतर्गत 358 एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी प्राप्त झाली आहे. आता हिंगोली जिल्ह्यांमध्ये जुनी व नवी मिळून सुमारे 400 एकर तुती लागवड आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव..! जाणून घ्या कांदा बाजार भाव

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Reshim Udyog: शेतकऱ्यांची ओढ तुती लागवडीकडे , ‘महारेशीम अभियानाला’ शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद 801 एकर क्षेत्रावर तुती लागवडीसाठी नोंदणी”

Leave a Comment