Remal Cyclone Update : मोठी अपडेट समोर; ताशी 110 ते 120 किमी वेगाने चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकणार, या बाबत IMD कडून मोठी अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Remal Cyclone Update | सध्या राज्यसह भारतावर चक्र वादळाचे मोठे संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान खात्याकडून या चक्रवादळाबाबत मोठे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

कृषिमंत्री यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार हे चक्र वादळ रविवारी रात्री पश्चिम बंगालमधील सागरीबेट आणि खेपा दरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. (Remal Cyclone Update) रेमल हे भारतात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर बंगालचे उपसागर मध्ये तयार झालेले चक्रीवादळ आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ रविवारी ११० ते १२० किलोमीटर प्रति तास वेगाने किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील सर्व विमान उडाणे रद्द करण्यात आलेली आहेत. तसेच येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच इथे रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 20 आणि 27 मे रोजी पश्चिम बंगालच्या उत्तर भागात तसेच, ओडिशाच्या किनारपट्टी भागात आणि भारताच्या नॉर्थ ईस्ट राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. व या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र बाबत बोलायचे झाल्यास राज्यातील पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर इतर राज्यातील भागांमध्ये उष्णतचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

तसेच महाराष्ट्रात नुसता पावसात पडणार नसून या काळामध्ये वादळाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. वादळाचा वेग प्रती तास 40 ते 50 किमी असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

रेमल चक्रीवादाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओडिशा मधील मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देखील भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. पुढील काही तासांमध्ये हे चक्रीवादळ धडकणार असून त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

1 thought on “Remal Cyclone Update : मोठी अपडेट समोर; ताशी 110 ते 120 किमी वेगाने चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकणार, या बाबत IMD कडून मोठी अपडेट”

Leave a Comment