या रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये तुमचे नाव आहे का पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Rules | पिवळे व केशरी रेशन कार्ड वापरणाऱ्या धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पिवळ्या व केशरी कुटुंबातील जन्मला आलेल्या मुलांना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे यासाठी 19 कोटी 70 लाखांचा निधी शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. Ration Card Rules

या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा

शासनाच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक अशा लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना महिला व बालविकास मंडळा अंतर्गत राबविण्यात येत आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील धारकांसाठी जन्मलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे.

पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 31 मे पर्यंत पूर्ण करावे लागणार हे काम, अन्यथा होणार मोठे नुकसान

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांना 19 कोटी 70 लाख रुपये निधी वितरित करण्यात आले आहेत याबाबत जिल्हास्तरावर जिल्हा न्याय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून एक एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्याची कारवाई विभागामार्फत करण्यात येणार आहे.

शासनांतर्गत आतापर्यंत जवळपास 35 हजार पाच जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील पंधरा दिवसात तालुका न्याय आणि जिल्हा न्याय कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्यांना जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालया संपर्क साधावे असे आवाहन वर्तमान मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत आता पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिली सहा हजार रुपये तसेच सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये प्रमाणे एकूण १,०१०००/- एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

ही योजना दिनांक एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू असणार आहे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.

1 thought on “या रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये तुमचे नाव आहे का पहा”

Leave a Comment