Poultry Farm Loan : आजकाल शेतकरी शेती सोबत अनेक व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायांपैकी एक व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन, सरकार कुक्कुटपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना 10 लाख रुपये पर्यंत अनुदान देणार आहे.
अनेक शेतकरी आता शेती सोबत जोड व्यवसाय करीत आहेत यामध्ये शेतकरी पशुपालन, शेळीपालन ,कुक्कुटपालन , यासारखे व्यवसाय करीत आहेत आजकाल शेतकरी शेतीला व्यवसायिक दृष्टिकोनातून बघत आहेत. व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी लाखो रुपयांची कमाई करीत आहे. पण यासाठी शेतकऱ्यांना पहिल्यांदी गुंतवणूक करावी लागत आहे. यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांना आता व्यवसाय करण्यासाठी अनेक योजना अंतर्गत कर्ज देत आहे. Poultry Farm Loan
सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी एक चांगली संधी निर्माण झाली आहे. आज-काल कुक्कुटपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेचे नाव महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना होय, या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन करण्यासाठी कर्ज दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत राज्य सरकार हे कुक्कुटपालनासाठी कर्जाच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना मदत करीत आहे. व यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे, त्यामुळे आता व्यवसायाला आर्थिक मदत मिळणार व शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होणार. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगले कर्ज मिळत आहे. शेतकऱ्यांना पोल्ट्री फार्म साठी बँकेकडून कमी वेळ दरात कर्ज देण्यात येत आहे. या योजनेचे माध्यमातून पोल्ट्री फार्म साठी 50 हजार ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
असा असणार कर्ज फेड कालावधी :-
या योजनेचे माध्यमातून जर तुम्ही कर्ज घेतले तर त्या कर्जाची फेड करण्याचा कालावधी 5 ते 10 वर्षे एवढा आहे. त्यामुळे आता या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगला व्यवसाय करण्याची संधी निर्माण करून देण्यात येत आहे. आणि कर्ज परतफेड करण्यासाठी कालावधी देखील जास्त देण्यात आला आहे. जेणेकरून शेतकऱ्यांकडे तोपर्यंत पैसा गोळा करण्यास मदत होणार आहे.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- राशन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा एक फोटो
- मतदान ओळखपत्र
- सहा महिन्याचा बँक स्टेटमेंट
- पोल्ट्री फार्म व्यवसायाचा परवाना
- विमा पॉलिसी
- चालू मोबाईल क्रमांक आधार कार्ड ची लिंक असलेला
या योजनेसाठी अर्ज कोठे करावा :-
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन त्या ठिकाणी अर्ज भरावा लागणार आहे.
- अर्ज मिळाल्यानंतर त्याच्यावरील सर्व माहिती काळजीपूर्वक करावी व सर्व डॉक्युमेंट काळजीपूर्वक या अर्जासोबत जोडावे.
- त्यानंतर त्या अर्ज आला तुमचा फोटो व सही करावी व तो अर्ज बँकेतील लोन विभाग मध्ये जमा करावा.
- त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
हे पण वाचा : 1200 रुपये किलो विकत ‘या’ कोंबडीचं चिकन; तर, एक अंडे 50 रुपयाला..!
1 thought on “सरकार देत आहे पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये..! योजनेसाठी असा करा अर्ज”