Police Constable Bharti: महाराष्ट्रात तब्बल 17 हजार 471 पदांची होणार पोलीस भरती …! विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Constable Bharti: पोलीस भरती ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये रखडलेल्या पोलीस भरतीला राज्य सरकारने अखिल लावला मुहूर्त पोलीस शिपाई पदांच्या सर्व वर्गातील तब्बल 70 हजार 471 जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

या भरतीची परीक्षा पद्धती ओएमआर अथवा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. गृह खात्याने 100% पदे भरण्यासाठी शासनाने निर्देश केला आहे.

सन 2022 व 2023 वर्षांमधील 31 डिसेंबर 23 अखेर पर्यंत राज्याच्या पोलिस दलातील पोलीस घटक प्रमुखाच्या आस्थापनेवरील वरील शिपाई संवर्गातील अनेक पदांकरिता ही भरती होणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई ,बँड्समन ,पोलीस शिपाई चालक, शस्त्र पोलीस शिपाई, व कारागृह शिपाई इत्यादी पदावर ही भरती होणार आहे. या पदांकरिता एकूण 17471 पदे उपलब्ध आहेत.Police Constable Bharti

या पदांची माहिती वित्त विभागाने 30 सप्टेंबर 2022 रोजी च्या शासन निर्णयाने प्रशासकीय विभागीय सुधारित अधिकृत बंद मंजूर केले आहे. या आधि ग्रह विभागाने 23000 पोलिसांची भरती केली होती, तरीदेखील पोलीस खात्याला मनुष्यबळ कमीच पडत आहे. या कारणाने आता नवीन आकृतीबंधानुसार गृह विभागाकडून नवीन पोलीस भरती होणार आहे.

राज्य सध्या पोलीस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत. त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलीस सेवानिवृत्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. 1000 पोलिसांचे प्रमोशन होत आहे व काही जण निवृत्ती घेत आहेत. या सर्व कारणामुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलीस रिक्त होत आहेत.

या पद भरती बाबत राज्य शासनाने जीआर काढला होता. सन 2022 व 2023 वर्षातील शिपाई वर्गातील रिक्त पदे 100% भरण्याचा आदेश शासनाने दिला आहे. व ही भरती परीक्षाही OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे असा GR गृह विभागाने काढला आहे.

हे पण वाचा: SBI बँक खातेदार असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी…! आता बँकेचे सर्व काम करा फक्त एक फोन कॉल करून

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “Police Constable Bharti: महाराष्ट्रात तब्बल 17 हजार 471 पदांची होणार पोलीस भरती …! विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी”

Leave a Comment