PM Kisan Yojana : सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करीत आहेत. या योजनेपैकीच सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकरी घेत आहेत, परंतु अजूनही अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
जर तुम्ही अजून या योजनेचा लाभ घेतला नसेल जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम या योजनेची पात्रता जाणून घ्यावे लागणार आहे व या योजनेसाठी नियम व अटी काय आहेत जाणून घ्या संपूर्ण माहिती.
जे शेतकरी या अटी पूर्ण करीत आहेत अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे :
शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावा म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्माननीय योजना सुरू केली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकरी घेत आहेत, परंतु अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. पी एम किसान योजना ही 2019 मध्ये पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 हजार रुपये दिले जात आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा केली जात आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्याला त्यांच्या खात्यामध्ये 2,000 हजार रुपये जमा केले जात आहे असे एकूण वर्षांमध्ये तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत.PM Kisan Yojana
मागील पी एम किसान योजनेचा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी पीएम मोदींनी पीएम किसान योजनेचा सोहळा हप्ता जरी केला आहे. माहितीनुसार हा हप्ता 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी व जमीन पडताळणी करणे आवश्यक झाले आहे.
पी एम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा :
जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल व तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान सन्माननीती योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतात.
पी एम किसान योजनेचे अधिकृत पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे हा पर्याय तुम्हाला पी एम किसान योजनेचे अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर दिसणार आहे.
पी एम किसान योजनेला अर्ज करण्यासाठी पात्रता :
सर्वप्रथम जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
एक जानेवारी 2019 पूर्वी अर्जदाराच्या नावावर जमिनीची नोंदणी असणे आवश्यक आहे. अर्जदाराची बँक खाते आधार कार्ड आणि NPCI शी लिंक असणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या शेतकऱ्यांना मिळत नाही पी एम किसान योजनेचा लाभ:
1 . जर कुटुंबामधील एका सदस्याला या योजनेचा लाभ मिळत आहे तर दुसऱ्या सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन नाही.
- 18 वर्षाखालील व्यक्ती योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही व या योजनेचा लाभ अशा व्यक्तीला मिळणार नाही.
- कुटुंबामधील कोणतेही व्यक्ती अनिवासी भारतीय असल्यास अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- जर कुटुंबामधील एखादी व्यक्ती सरकारी नोकरी असल्यास अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही
- जर कुटुंबातील कोणतेही सदस्याला दहा हजार पेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
हे पण वाचा : या नागरिकांचा एसटीचा मोफत प्रवास होणार बंद ? वाचा सविस्तर माहिती
2 thoughts on “PM Kisan Yojana | पी एम किसान सन्मान निधी योजना करिता पूर्ण कराव्या लागणार आता या अटी ..! तरच मिळणार पीएम किसान योजनेचा हप्ता”