पी एम किसान चा सोळावा हप्ता मिळाला नाही तर काय करावे? पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाही तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करावे? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय? पहा सविस्तर माहिती.

देशातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे कारण आज प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. सुमारे नऊ कोटी शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. या दरम्यान जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाही तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सर्व सविस्तर माहिती एका क्लिकवर.

ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा झाला नाही त्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची स्थिती तपासावी. त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही हे तपासावे. तुम्ही तुमच्या बँकेची वेबसाईट किंवा मोबाईल ॲप वापरून तपासू शकता.

या शिवाय शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्याची संपर्क साधावा तसेच शेतकरी मित्रांनी पी एम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार देखील करू शकतात.

तक्रार कशी करायची? | PM Kisan Yojana

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाईटवर https://pmkisan.gov.in जाऊन लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर रजिस्टर कंप्लेंट पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची तक्रार लिहा.
  • तक्रारी सोबत तुमच्या कागदपत्राच्या प्रतिजोडा.
  • तुमच्या तक्रारी तुमचे नाव पत्ता बँक खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट करा.
  • शेवटी शेतकरी बांधवांनी सबमिट बटनावर क्लिक करावे.

दरम्यानच्या शेतकऱ्यांनी अद्याप इतिहास केलेले नाही तसेच अर्ज भरताना तुमचे नाव वडिलांचे नाव बँक खाते तपशील किंवा इतर कोणतीही चूक झाली असल्यास तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इ केवायसी करून घ्यावी तसेच काही अपूर्ण माहिती असल्यास ती माहिती पूर्ण करावी. म्हणजे तुम्हाला योजनेचा सोळावा हप्ता मिळेल.

एकाच वेळा राज्याचे व केंद्राचे मिळून मिळाले 6000 रुपये

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या16 व्या हप्त्याची वितरण करण्यात आले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाच वेळी राज्याने केंद्राचे सहा हजार रुपये मिळाले आहेत. पी एम किसान योजनेचे 2000 रुपये व नमो शेतकरी महासंघ योजनेचे दुसरा हप्ता व तिसरा हप्ता मिळवून 4000 रुपये असे एकूण 6000 रुपये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

हे पण वाचा:-

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! शेतकऱ्यांचे ₹ 200000 पर्यंतचे कर्ज माफ? यादीत तुमचे नाव पहा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “पी एम किसान चा सोळावा हप्ता मिळाला नाही तर काय करावे? पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment