Pm Kisan Registration : शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यातील असे बरेच शेतकरी आहे की त्यांना या पी एम किसान योजनेचा लाभ भेटत नाही आणि यामध्ये या पीएम किसान चा लाभ भेटण्यासाठी ही पी एम किसान नोंदणी करणे आवश्यक असते यासाठी ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावे लागणार याबद्दलची सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे ती माहिती तुम्ही सविस्तरपणे जाणून घ्या.
या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक प्रकारे मदत ही दिले जात असते म्हणजेच दोन दोन हजार हजार रुपयाचे चार महिन्यांच्या अंतरावर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात जेणेकरून आपण आपला शेतीवरील खर्च हा कमी करू शकतो.
हे पण वाचा, किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांना भेटणार, 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…!
पीएम मोदींनी यावर्षी महाराष्ट्र राज्यातील 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत 16 वा हप्ता जारी केला होता. ही रक्कम डीबीटीद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यात आलेली आहे.
आणि ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती चार महिन्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचे 3 हप्त्यांमध्ये पाठवले जाते. यामध्ये आतापर्यंत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या या खात्यावरती तीन लाख कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत.
तर, पीएम किसान सन्मान निधीची नोंदणी ही कशी करायची?
तुम्हाला या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्त्याचा लाभ हा घ्यायचा असेल तर तुम्ही ही नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये नोंदणीची प्रक्रिया ही अगदी सोपी आहे. स्टेप बाय स्टेप या प्रक्रिया बद्दलची माहिती दिलेली आहे. pm kisan registration:
स्टेप बाय स्टेप याबद्दलची प्रोसेस ही जाणून घ्या.
- यासाठी तुम्हाला सर्वप्रथम pmKisan.gov.in या पोर्टल ला भेट द्या व former corner वर क्लिक करा.
- न्यू फार्मर रजिस्ट्रेशनच्या या पर्यावरण क्लिक करा आधार व मोबाईल नंबर टाकून तुमचे राज्य निवडा.
- मग तुम्हाला ओटीपी येईल हा ओटीपी एंटर करा व प्रोसेस फोर रजिस्ट्रेशनचा हा पर्याय निवडा.
- यामध्ये विचारलेले सर्व तपशील भरा व आधार प्रमाणीकरण या बटणावर क्लिक करा.
- मोबाईल नंबर वर येऊन ओटीपी भरा व शेतीशी संबंधित तपशील आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
- संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण झाल्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल.
अशा पद्धतीने तुम्ही या पीएम किसान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकतात. आणि हे सर्व प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटण्यास सुरुवात होईल.