Pm Kisan: केंद्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत परत दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारी या योजनेतील रक्कम वाढवणार आहे. मात्र आता या संदर्भात सरकारकडून स्पष्टीकरण आले आहे.
लोकसभेत याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यक देण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमधील 6,000 हजार रक्कम ऐवजी शेतकऱ्यांना 12,000 रक्कम मिळणार आहे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत होती. परंतु असा सरकारचा कोणताही विचार नाही असे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे लेखी उत्तरात सांगितले आहे.
लोकसभेमध्ये सरकारला विचारल्यानंतर की या योजनेतील वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 12,000 रुपये करण्याचा विचार सरकार करीत आहे का? या प्रश्नावर मंत्री अर्जुन मुंडा म्हणले की असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचारांमध्ये नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका.Pm Kisan
यानंतर कृषिमंत्री या योजनेबद्दल आणखी माहिती सांगितली की, या योजनेअंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना 15 हप्ते मध्ये 2.81 लाख कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तरण योजना आहे.
2019 मध्ये मोदी सरकारने प्रसिद्ध प्रधान किसान सन्मानित योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे.
हे पण वाचा: शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13,500 नुकसान भरपाई, यादीमध्ये तुमचे नाव आहे का?
1 thought on “शेतकऱ्यांचे खात्यात 12 हजार रुपये होणार जमा..? कृषिमंत्री यांनी दिले उत्तर”