Pik Vima Bharpei: पिकविम्याचे शेतकऱ्याला पैसे आणखीन किती भेटणार? रब्बीचा पिक विमा हा शेतकऱ्यांना नेमका झाला किती मंजूर झाला?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Bharpei: मागील हंगामामधील खरीप व रब्बी या हंगामामधील पिक विमा भरपाईची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. व गेल्या खरिपामध्ये विक्रमी 7 हजार 396 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झालेली होती .खरीप हंगामामधील एकूण मंजूर भरपाई पैकी तब्बल 5261 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. व 2135 कोटी रुपये शेतकऱ्यांना हे अजून वाटप करण्याचे बाकी आहेत. यामधील बहुतांशी रक्कम ही 6 जिल्ह्यांमधील आहे.

पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!

रब्बी हंगामाला 400 कोटी रुपयांची भरपाई ही आलेली होती. रब्बी मधील जवळपास सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. खरीपामधील 2135 कोटी रुपयांची भरपाई ही कोणत्या जिल्ह्यामधून व का रखडली, ही भरपाई केव्हा भेटणार? याची माहिती तुम्हाला यामध्ये मिळेल.Pik Vima Bharpei:

रखडलेल्या एकूण रकमेपैकी 2092 कोटी रुपये हे ओरिएंटल कंपनीकडे आहेत. ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई 110% पेक्षा जास्त झालेली आहे. व बीड पॅटर्ननुसार 110% पेक्षा जास्त भरपाई देणे असल्यास राज्य सरकारला वाढलेली भरपाई ही द्यावी लागते. व त्यामुळे खरीप हंगामामधील 2023 च्या ओरिएंटल कंपनीकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची भरपाई हे अजून रखडलेली आहे.

पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!

तर, कोणत्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही भरपाई रखडलेली आहे.

या मध्ये प्रामुख्याने चंद्रपूर,जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर व सातारा या 6 जिल्ह्यांमध्ये या शेतकऱ्यांची भरपाई हे रखडलेली असून, बहुतांशी शेतकरी हे पीक विम्याची वाट पाहत असले, तरीसुद्धा 6 जिल्ह्यांमधील पिक विमा हा अजून रखडलेला आहे. कारण हे जिल्हे ओरिएंटल कंपनीकडे असल्याचे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच इतर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काही प्रकरणे वगळली तर, ही भरपाई देऊन झालेली आहे.

पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!

मागील खरिपामध्ये पाऊस कमी होता त्यामुळे पिकाचे नुकसान हे जास्त प्रमाणावर झाले होते. म्हणून खरिपामध्ये विक्रमी भरपाई मंजूर झाली आहे. व ही भरपाई आता बहुतांशी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पूर्णपणे देऊन झाली. व यापुढे केवळ ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा मोजक्या शेतकऱ्यांनाच या पुढच्या काळामध्ये हा विमा मिळू शकतो.

यामध्ये रब्बीचा प्रमुख्याने विचार केला तर, रब्बीसाठी शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई ही मंजूर झालेली होती व खरिपामध्ये 7396 कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर झालेली आहे. व रब्बी हंगामामध्ये केवळ 400 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झालेली होती. रब्बी हंगामामधील पिकांचे नुकसान देखील खूप प्रमाणावर झालेले होते. पण मात्र, भरपाई ही अगदी नगण्य मिळाली. अशी माहिती कृषी विभागाने दिलेले आहेत.

Leave a Comment