पहा महाराष्ट्र राज्यातील कांद्याचे विक्रमी बाजार भाव, अखेर उन्हाळी कांद्याने 5 हजारांचा टप्पा गाठलाच!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की पोळा या सणा दिवशी कांद्याच्या बाजारभावामध्ये बदल झालेले होते. पण, आता याच कांद्याच्या बाजारभावामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये 5 हजार रुपयांनी कांद्याचे भाव हे वाढलेले आहे, असे ऐकायला भेटत आहे. तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये या कांद्याला जास्त भाव मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता फारच आनंदाची ही बातमी आहे. नगर, पुणे व नाशिक या जिल्ह्यांमधील या उन्हाळी कांद्याच्या उत्पादनामध्ये शेतकऱ्यांसाठी ही चांगलीच खास बातमी ठरणार आहे. कारण की, या उन्हाळी कांद्याने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी 5 हजार रुपयांनी झेप घेऊन मोठे कार्य केले आहे. काल झालेल्या लिलावामध्ये महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 5 हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे हा भाव भेटला आहे.

या लोकसभा निवडणुकीच्या आधी या कांद्याला फारच कवडीमोल भाव भेटत होता. अगदी रद्दी पेक्षा ही कमी भावामध्ये या कांद्याची विक्री करावी लागत होती. पण आता यामुळे या पिकासाठी आलेला खर्च हा देखील भरून निघत नव्हता. कांदा उत्पादक शेतकरी बांधव हे या पिकामुळे फारच कर्जबाजारी झालेले पाहायला मिळत होते.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान.

लोकसभा निवडणुकीनंतर बाजाराचे हे चित्र आता पूर्णपणे बदलेल व गेल्या काही दिवसांपासून या कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा झालेले असून, बाजार भाव हा आता टिकून आहेत. पण मात्र, आशातच नफेडफे स्टॉक मधील हा कांदा खुल्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणला जात आहे.

अवघ्या 35 रुपये किलो या भावामध्ये ग्राहकांसाठी कांदा हा उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा परिणाम म्हणून या मार्केटमध्ये कांद्याची उपलब्ध ही आता फारच वाढणार आहेत. व साहजिकच याचा दबाव हा बाजारभावांवर येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान.

शेतकऱ्यांच्या कांद्याची मागणी घसरणार व बाजारभावावर विपरीत परिणाम होणार, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. पण मात्र असे असले तरी 8 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला विक्रमी भाव भेटला आहे.

विक्रमी भाव हा कुठे मिळाला?

रविवारी झालेल्या लिलावामध्ये जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 2000 व कमाल 5000 व तसेच सरासरी 4000 असा भाव मिळाला आहे.

कोपरगाव, शिरसगाव येथील तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्या लिलावामध्ये उन्हाळी कांद्याला किमान 1500 व कमाल 4250 व तसेच सरासरी 3970 असा भाव भेटला आहे.

व रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 4000 व कमाल 5000 व तसेच सरासरी ही 4500 असा भाव मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक कधी? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आव्हान.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान 3000 कमाल 4500 व सरासरी 3750 प्रमाणे भाव भेटला.

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारच्या लिलावामध्ये बाजारातील लाल कांद्याला किमान 1000 व कमाल 4400 व तसेच सरासरी ही 3000 असा भाव मिळाला आहे.

जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आळेफाटा या उपबाजारात चिंचवड कांद्याला किमान 2700 व कमाल 4710 व सरासरी 4100 असा भाव मिळाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 500 व कमाल 4600 व सरासरी 3400 असा भाव भेटला आहे.

दौंड केडगाव या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 1500 व कमाल 4500 व तसेच सरासरी 3800 असा भाव भेटला आहे.

1 thought on “पहा महाराष्ट्र राज्यातील कांद्याचे विक्रमी बाजार भाव, अखेर उन्हाळी कांद्याने 5 हजारांचा टप्पा गाठलाच!”

Leave a Comment