Onion Price Today : कांदा निर्यातबंदीमुळे गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना 3 हजार कोटींवरील आर्थिक नुकसान झाले आहे. आता कांदा बाजार भाव मध्ये तब्बल 400 ते 600 रुपये प्रति क्विंटल मागे दर घसरले आहेत.
कांदा निर्यात बंदीमुळे गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना तब्बल 3000 कोटी ची आर्थिक नुकसान सोसावी लागली आहे. डिसेंबर ते मार्च या कालावधी मध्ये जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा निघला नाही , याकडे सरकारने दुर्लक्ष केले असे स्पष्ट होत आहे. आता पुन्हा मार्च महिन्यामध्ये 400 ते 600 रुपये पर्यंत कांद्याचे दरामध्ये घसरन दिसून आली आहे.
डिसेंबर महिना वगळता कांद्याला अध्याप्ती 2000 वर दर मिळाला नाही. कांद्याला सरासरी एक हजार रुपये सातत्याने दर मिळत आहे, अशी दराच्या बाजूने प्रतिकूल परिस्थिती कायम आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार नऊशे रुपये पर्यंत सरासरी मिळत आहे. Onion Price Today
मात्र आता मार्च महिना संपत येता येता कुंटल मागे तब्बल 400 रुपये ते 600 रुपये ची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नाचे खर्च सुद्धा निघत नाही. यामुळे शेतकरी आता चिंतेत आले आहे व संकटात सापडले आहेत.
सध्या जिल्ह्यामध्ये प्रमुख बाजार समितीमध्ये लेट खरीप कांद्याचे भाव कमी होत आहे, थोडाफार प्रमाणात उन्हाळा कांद्याची आवक सुरू झाली आहे. आशियामध्ये शेतकरी वाढते वयाच्या चटक्यात लेट खरीप कांदा काढून त्याची विक्री करीत आहे.
पण बाजारामध्ये सुधारणा काही दिसून येत नाही व सातत्याने घसरण सुरू आहे. डिसेंबर महिन्यात काही बाजार समितीमध्ये प्रामुख्याने , लासलगाव ,पिंपळगाव बसंत ,उमराणे ,देवळा, चांदवड, येवला ,या बाजार समितीमध्ये हळूहळू कांद्याचे भाव वाढू लागली आहे.
या आधी कांद्याला तीन हजार रुपये वर दर मिळत होता ग्राहकांची ओरड नसताना कांद्याचे उपलब्ध व दर नियंत्रणासाठी केंद्राने निर्यात बंदी केल्याने भावातील घसरण कायम आहे. प्रतिकूल परिस्थिती कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तोट्यात वेळ आली आहे. तर नियत बंदी नंतर सरासरी दरात जवळपास दोन हजार रुपयांची दरात तफावत आहे.
दर घसरत असल्याची काही प्रमुख कारणे :-
- राष्ट्रीय निर्यात सहकारी मर्यादित या संस्थेकडून कांदा निर्यात करण्यासाठी होणारी कांद्याची खरेदी ठराविक घटकांकडून सुरू असल्याने कांदा खरेदीवर केंद्रीकरण झाल्याने संधी कमी.
- सध्या देशांतर्गत मागणी घटल्याने पुरवठा मंदावला व काही प्रमाणात स्थानिक आवक.
- होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या कांदा रॅक लोडिंग कामकाज कमी प्रमाणात होत आहे.
हे पण वाचा : या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले 4,000 हजार रुपये ! असे करा स्टेटस चेक
2 thoughts on “कांद्याचे दरात मोठी घसरण, क्विंटलमागे तब्बल 400 रुपयांनी घसरले कांद्याचे दर”