कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा सुधारणा; तर, जाणून घ्या आजचे महाराष्ट्र राज्यातील बाजारभाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market In Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहिलेच असेल, की कांद्याला हा भाव किती आहे. आणि या कांद्याला सर्वात जास्त भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळत आहे. तर आता यामध्ये तुम्ही जाणून घ्या की, कांद्याच्या भावामध्ये सुधारणा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाली आहे.

कांद्यावरील ही निर्यात बंदी कायम राहणार असल्याने केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कांद्याचे भाव हे गुरुवारी घसरलेले होते. पण मात्र, आज त्यामध्ये पुन्हा काहीशी सुधारणा झालेली आहे.

तर लासलगाव बाजार समितीमध्ये बुधवारी कमाल 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव भेटला होता. कि ज्यामध्ये आज 1792 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतची वाढ ही झालेली आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये आज शनिवारच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावात जवळपास 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलने वाढ हे झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे.Onion Market In Maharashtra:

हे पण वाचा, एस टी महामंडळाने घेतला मोठा निर्णय, राज्यातील पुरुष व महिलांसाठी सहा महिने मोफत एसटीचा प्रवास! कोणाला भेटणार लाभ ?

कोणत्या बाजार समितीमध्ये भावात झाली सुधारणा?

  • लासलगाव, बाजार समितीमध्ये आज 8313 क्विंटलची आवक झालेली असून, जास्तीत जास्त 1792 ते कमीत कमी 800 रुपये तर यामध्ये सरासरी 1670 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव भेटला आहे.
  • विंचूर बाजार समितीमध्ये आज 12500 क्विंटलची आवाज झालेली असून, जास्तीत जास्त 2016 ते कमीत कमी 1000 रुपये तर यामध्ये सरासरी 1750 रुपये प्रतिक्विंटल एवढी आहे,
  • पिंपळगाव बसवंत, या बाजार समितीमध्ये आज 18000 क्विंटल एवढी आवक झाली असून, जास्तीत जास्त 2000 ते कमीत कमी 300 रुपये तर यामध्ये सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल एवढी आहे.
  • सोलापूर ,या बाजार समितीमध्ये आज 30627 क्विंटल एवढी आवक झाली असून, जास्तीत जास्त 2700 ते कमीत कमी 200 रुपये तर यामध्ये सरासरी ही 1300 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे हा भाव मिळाला आहे.
  • येवला, या बाजार समितीमध्ये आज 15000 क्विंटल एवढी आवक झालेली असून, जास्तीत जास्त 1855 ते कमीत कमी 700 रुपये तर यामध्ये सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल एवढी आहे.
  • दिंडोरी-वणी, या बाजार समितीमध्ये आज 5846 क्विंटल एवढी आवक झालेली असून, जास्तीत जास्त 2081 ते कमीत कमी 1051 रुपये तर यामध्ये सरासरी ही 1521 रुपये प्रति क्विंटल एवढी आहे.
  • देवळा, बाजार समितीमध्ये आज 3950 क्विंटल एवढी आवक झालेली असून, जास्तीत जास्त 1800 ते कमीत कमी 355 रुपये तर यामध्ये सरासरी ही 1780 रुपये प्रति क्विंटल एवढी आहे.
  • चांदवड, या बाजार समितीमध्ये आज 4000 क्विंटल झालेली असून, जास्तीत जास्त 1850 ते कमीत कमी 780 रुपये तर यामध्ये सरासरी ही 1680 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे एवढा भाव मिळाला आहे.

हा भाव कुठे स्थिर आहे ?

मुंबई बाजार समितीमध्ये आज 9757 क्विंटल आवक झालेली असून, जास्तीत जास्त 2000 ते कमीत कमी 1400 रुपये तर यामध्ये सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल एवढी आहे.

पुणे या बाजार समितीमध्ये आज 16156 क्विंटल आवक झालेली असून, जास्तीत जास्त 1700 ते कमीत कमी 500 रुपये तर यामध्ये सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल एवढी आहे.

कोल्हापूर या बाजार समितीमध्ये आज 4861 क्विंटल आवक झालेली असून, जास्तीत जास्त 2200 ते कमीत कमी 700 रुपये तर यामध्ये सरासरी ही 1400 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव भेटला आहे.

याच दरम्यान आज सोलापूर या बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच इतर बाजार समितीमध्ये सुद्धा या कांद्याच्या भावामध्ये प्रत्येक क्विंटल मागे 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल एवढी नोंद ही नोंदवली गेलेली आहे. याशिवाय मागील सोमवार ते शुक्रवारच्या तुलनेमध्ये झालेल्या या आवकच्या तुलनेत आज सर्वच मार्केट हे आता वाहनांनी फुल झाल्याचे सांगितले जात आहे.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा सुधारणा; तर, जाणून घ्या आजचे महाराष्ट्र राज्यातील बाजारभाव !”

Leave a Comment