महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव..! जाणून घ्या कांदा बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market in Maharashtra: निर्यात बंदी नंतर कांदा बाजारभाव मध्ये घसरण सुरू आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समिती आवारामध्ये आंदोलन देखील केले आहे. मात्र कांद्याचे बाजार भाव मध्ये कसलाच फरक पडला नाही. मागील 4 ते 5 दिवसाचा विचार केला तर काल कांद्यामध्ये थोडा बदल दिसून आला आहे, दोन दिवसापासून कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळत आहे . त्यातच काल कांद्याला अकराशे रुपये बाजार भाव मिळाला आहे.

कुठे आवक घटली कुठे वाढली कांद्याला कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव :

लासलगाव बाजार समितीमध्ये काल लाल कांद्याची दहा हजार क्विंटल झाली आहे. तरी काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत-कमी 500 रुपये तर सरासरी 1160 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. येवला तालुक्यातील अंदरसुल बाजार समितीत 12000 क्विंटर कांद्याचे आवक झाली असून, या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1150 रुपये दर मिळाला आहे.

लासलगाव विंचूर बाजार समितीत 11 2200 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 450 व सरासरी 1151 रुपये दर मिळाला आहे. या बाजार समितीच्या जवळच असलेले पिंपळगाव वसंत बाजार समितीत दहा हजार आठशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे या बाजार समितीमध्ये कांद्याला 400 रुपये पासून 1100 रुपये पर्यंत दर मिळाला आहे.Onion Market in Maharashtra

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव:

राज्य मधील बाजार समितीचा विचार करिता छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत काल 2331 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या समितीमध्ये कांद्याला कमीत कमी 275 तर सरासरी 688 रुपये दर मिळाला आहे. याचबरोबर जळगाव बाजार समितीत काल 2838 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. व या ठिकाणी कांद्याला कमीत कमी 300 रुपये व सरासरी 627 रुपये दर मिळाला आहे.

मुख्य मानली जाणारी बाजार समिती पुणे बाजार समितीमध्ये काल कांद्याची 1347 क्विंटल आवक झाली आहे. या ठिकाणी कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 900 रुपये बाजार भाव देण्यात आला आहे. काल सर्वाधिक बाजारभाव पेन बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे या ठिकाणी कांद्याला 2400 भाव मिळाला आहे. व काल सर्वात कमी भाव जळगाव बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला. जळगाव बाजार समितीमध्ये सरासरी 627 रुपये इतका भाव मिळाला.

हे पण वाचा: तुरीच्या भावामध्ये झाली विक्रम वाढ..! तुरीचे भाव 10,500 रुपय पार

अशाच बाजारभावाच्या माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचा बाजारभाव..! जाणून घ्या कांदा बाजार भाव”

Leave a Comment