कांदा निर्यातीच्या बातम्या खोट्या..! शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Export News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने कांदा निर्यात सुरू करणार असल्याची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा गंभीर आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे. कांदा उत्पादकांची नाराजी दूर करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये मते मिळवण्याचा हा मोदी सरकारचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

आजचे कांद्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गुजरात राज्यातून पांढरा कांदा निर्यात करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होऊ नये म्हणून केंद्र सरकारने 19150 टन कांदा निर्यात करणार असल्याची खोटी बातमी प्रसारित केली. असे प्रसिद्ध पत्रकार यांनी म्हटले आहे.

प्रत्यक्षात पाहिलं तर एप्रिल 2023 पासून आतापर्यंत विविध देशाला निर्यात केलेला कांद्याची ही एकूण बेरीज आहे. नवीन कांदा निर्यातीबाबत कोणताही आदेश निघालेला नाही. हा निर्यात होणार कांदा शेतकऱ्याकडून खरेदी होत नाही. या निर्यातीसाठी टेंडर काढले जाते तसेच एनसीएल मार्फत निर्यात केली जाणार आहे. Onion Export News

राज्यातील या 80 हजार शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा

पांढऱ्या कांद्याचा काळाबाजार

गुजरात मधील काही कांदा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पांढरा कांदा खरेदी करून ठेवला होता. परंतु निर्यात बंदी असल्यामुळे हा कांदा निर्यात होऊ शकत नव्हता. केंद्र सरकारसोबत चांगले संबंध असलेल्या काही व्यापाऱ्यांनी तोडपाणी करून निर्यातीची परवानगी मिळवली. आणि परवानगी चे अध्यादेश काढले. आणि एकाच दिवसात पूर्ण कांदा बोटीवर चढवून रवाना करण्यात आला.

एसटी महामंडळाच्या तिकिट दरात वाढ..! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले तिकीट, पहा नवीन तिकिटाचे दर

भारतात होत आहे कांदा तस्करी

गुजरात मधील बंदरावरून मोठ्या प्रमाणात कांद्याची तस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे. पंधरा रुपये किलोने खरेदी केलेला कांदा फार तर 25 रुपये किलो प्रमाणे दुसऱ्या देशात पोहोचला जात आहे. त्या ठिकाणी या कांद्याला 80 रुपयाच्या दरम्यान दर मिळत असल्याने तस्करीची मोठी कमाई देखील होत आहे. कांद्याच्या या तस्करीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

धन्यवाद..!

2 thoughts on “कांदा निर्यातीच्या बातम्या खोट्या..! शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न…”

Leave a Comment