National Food Security: महाराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना अत्यंत कमी भावामध्ये रेशन धान्याचा पुरवठा हा होत असतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता राज्य सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातलेली आहे. आणि या योजनेमधील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून लागणार आहे.ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली असून, ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेले नाही, अशा लाभार्थ्यांचे रेशन धान्य हे 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. 23 सप्टेंबरच्या रिपोर्टर नुसार महाराष्ट्रातील 4 कोटी सदस्यांसह सोलापूर जिल्ह्यामधील रेशन कार्ड वरील 16 लाख 32 हजार 785 जणांनी ई-केवायसी अजून केलेली नाही.National Food Security:
बांधकाम कामगार या योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती!
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य भेटण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना ई-केवायसीचे बंधन राज्य सरकारने घातलेले आहेत. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. पण तरी देखील अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी ची प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन हे 1 नंबर पासून बंद होणार आहे.
बांधकाम कामगार या योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती!
ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. आणि जर या शिधापत्रिकाधारकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत ही ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, तर त्यांना रेशनचे धान्य हे भेटणार नाहीत. याशिवाय अशा शिधापत्रिका धारकांची नावे ही रेशन कार्ड मधून वगळली जाणार आहे. आणि त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. आता पुढील 36 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 4 कोटी तर जिल्ह्यातील 20 लाख व्यक्तींची ही ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे.
बांधकाम कामगार या योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती!
ई-केवायसी मधून बनावट लाभार्थींचा शोध
रेशन कार्ड वर मोफत राशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेकजण स्वस्तातील धान्य घेत असतात. याशिवाय अनेक लोक या योजनेचे राशन घेत आहेत. व जे लोक सध्या या जगात नाहीत त्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांचे नावे शिधापत्रिकांमध्येच आहेत व दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत.
बांधकाम कामगार या योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती!
या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिका धारक म्हणजेच, कुटुंबांच्या शिधापत्रिका मध्ये ज्या ज्या सदस्यांची नावे नोंदवले आहेत. त्या त्या सर्वांना ई-केवायसी करावीच लागणार आहे. त्यासाठी ते त्यांच्या जवळच्या अन्नपुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊ शकतात. पण रेशनकार्डावरील जो कोणी सदस्य मुदतीत ही ई-केवायसी करणार नाही, त्यांचे नाव शिधापत्रिकेमधून काढून टाकले जाणार.
ई-केवायसी केलेल्यांची सद्यस्थिती
रेशन कार्ड वरील एकूण सदस्य, 23, 37, 865
ई-केवायसी पूर्ण केलेले सदस्य, 2, 24, 047
ई-केवायसी प्रलंबित, 4, 81, 033
ई-केवायसी न केलेले, 16, 32, 785
1 thought on “राशन कार्ड धारकांसाठी मोठे बातमी, ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून रेशन धान्य बंद! शेवटची मुदत 31 ऑक्टोंबर, अन्यथा रेशन कार्ड रद्द होऊन जाईल!”