Namo shetkari Yojana : नमो शेतकरी योजनाही महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये रक्कम दिली जात आहे. या योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांना दिला आहे. व आता शेतकरी दुसऱ्या हप्तेची वाट बघत आहेत. आज आपण दुसऱ्या हप्ता विषयी सविस्तर माहिती देणार आहे.
महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने प्रसिद्ध केली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुसरे हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या आर्थिक मदतीची गरज आहे.
यावर्षी आपण पाहिलं की पहिल्यांदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली व त्यानंतर अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आता अडचणीत आहेत. ज्यामुळे शेतकरी आता या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत. ज्या करणारे शेतकऱ्यांची अडचणी दूर होतील.
हे पण वाचा : शेतकरी मित्रांनो लवकर करा हे काम पूर्ण, नाही तर मिळणार नाही 16 हप्ता.
केंद्र सरकारने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आहे. ज्या कारणाने शेतकऱ्यांना आता 6000 हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहे. आता शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये रक्कम मिळत आहे.
हे काम करा पूर्ण नाही तर मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता : नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र या योजनेचा पहिला हप्ता 85.6 लाख शेतकऱ्यांनाच मिळाला आहे. कारण राहिलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची केवायसी ( E-kyc ) पूर्ण केली नाही. ज्या कारणाने या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये ही रक्कम जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहे.
1 thought on “Namo shetkari Yojana : या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता.”