Milk increase : शेतकरी मित्रांनो ही बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगलीच आहे, कारण या बातमीमध्ये तुम्हाला सांगण्यात येत आहे, की दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दूध वाढ करण्यासाठी कोणकोणते उपाय करावे लागणार आहेत ते आपण या मध्ये जाणून घेऊया.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की आता वातावरणामध्ये हळूहळू प्रमाणात बदल होत आहे. व आता काही दिवसांनीच उन्हाळा या ऋतूला सुरुवात होत असून, वातावरण
हे पूर्णपणे बदलून जाणार आहे .ज्याचा परिणाम हा दुधाळ जनावरांवर होईल.
या दूध उत्पादनामध्ये जर मोठे घट होत असेल, तर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याची गरज नाही कारण, तुम्ही तुमच्या घरीच या दुधाळ जनावरांच्या दूध वाढण्यासाठी काही उपाय करू शकतात. की, ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दूध उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी चांगलीच मदत करतील. तर मग हे कोणते उपाय आहेत ? जे दूध वाढण्यासाठी मदत करतील. चला तर मग जाणून घेऊया, या उपायांबद्दल.Milk increase
हा चवळीचा पाला जनावरांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल.
असे बरेच जे शेतकरी आहेत की जनावरांच्या दुधाच्या वाढीसाठी अनेक प्रकारच्या कंपन्यांचे पावडरी व औषधांचे मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात, या वापराने दुधाळ जनावरांच्या वाढीमध्ये थोडासा परिणाम होतो. पण, या कंपन्यांच्या पावडर व इंजेक्शनमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या पावडर व इंजेक्शनमुळे ज्या दुधामध्ये वाढ होते. असे दूध हे मानवी शरीराच्या आरोग्यासाठी चांगलेच हानिकारक सुद्धा ठरू शकते.
म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घरगुती पद्धतीने या जनावरांच्या आहाराचे नियोजन करून लक्षपूर्वक सांभाळ करावा. दूध वाढण्यासाठी शेतकऱ्याने चवळीच्या पाल्याचा जनावरांच्या पौष्टिक आहारामध्ये समावेश करावा. असं केल्याने जनावरांच्या दुधामध्ये वाढण्याची शक्यता निर्माण होईल.
तर काय आहेत ? महत्त्वाचे घरगुती उपाय..!
तुम्हाला गाई व म्हशींच्या दुधामध्ये वाढ करण्यासाठी साधारण 250 ग्रॅम गव्हाचे पीठ, 50 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम गूळ आणि एक कच्चे खोबरे व 25-25 ग्रॅम जिरे एवढ्या गोष्टी आवश्य लागतात. यामुळे गव्हाचे पीठ, मेथी, जिरे, गूळ हे चांगल्या प्रकारे एका पातेल्यामध्ये शिजवून घ्यावे. आणि नंतर यामध्ये खोबरे बारीक करून त्यामध्ये टाकावे. हे सर्व शिजवून झाल्यानंतर ते थंड करून घ्यावे व थंड केल्यानंतर जनावरांना लगेच चाऱ्यामध्ये द्यावे.
सकाळी-सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जनावरांना उन्हाळ्यामध्ये दोन महिने हे खाद्य खायला द्यावे.
हे शक्य जर नसल्यास तुम्ही रोज गाईला या गव्हाच्या पिठाचा केवळ एक गोळा देखील तुम्ही देऊ शकतात. आणि यामध्ये मोहरीचे तेल व गव्हाच्या पिठापासून त्या दूध वाढण्यासाठी तुम्ही रोज सकाळी दोनशे ते तीनशे ग्रॅम मोहरीचे तेल सुद्धा यामध्ये द्यावे
250 ग्रॅम एवढा गव्हाच्या पिठाचा असलेला गोळा हा देण्याचा उपाय करू शकतात. मात्र, हा गोळा दिल्यानंतर लगेचच जनावरांना पाणी पाजू नये, अन्यथा जनावरांच्या पोटावर परिणाम होऊ शकतो. या तीन उपायांपैकी कोणताही एक उपाय दररोज केल्याने तुमच्या दूध वाढीमध्ये परिणाम होऊ शकतो.
हे पण वाचा : पांढऱ्या सोन्याचे दर आता सुधारण्याचे संकेत..! अभ्यासाकांनी वर्तवला अंदाज, पहा सविस्तर माहिती
अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा 👈
1 thought on “Milk increase: दुध उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी, हे करा तीन घरगुती उपाय..!”