दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाचे 176.92 कोटी रुपये जमा! तुम्हाला मिळाले की नाही पहा येथे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Milk Business Plan: नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाचे 176.92 कोटी रुपये जमा झाले आहेत. दुधाला मिळणाऱ्या कमी किमतीमुळे शेतीसाठी जोडधंदा म्हणून केला जाणारा दूध व्यवसायाला कंटाळलेले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचा लाभ आत्तापर्यंत 176 कोटी 92 लाख रुपये इतका निधी 2 लाख 72 हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.

तुम्हाला दूध अनुदान मिळाले आहे की नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सुरुवातीला एका महिन्यासाठी असलेले हे अनुदान नंतर दोन महिन्यासाठी वाढवण्यात आले आहे. त्यानंतर 11 जानेवारी 2024 ते 10 मार्च 2024 या कालावधीसाठी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. दूध व्यवसायातील वेगवेगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनुदानाची मागणी केली जात होती. त्यानुसार 5 जानेवारी 2024 रोजी राज्य सरकारने सहकारी संघ आणि खाजगीत प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केली. या योजनेची अंमलबजावणी राज्यात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

राज्यातील 279 सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्प अनुदानासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 235 प्रकल्पांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली त्यामुळे या प्रकल्पामध्ये दूध पुरवठा करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांच्या गाईंना पॅकिंग करण्यात आली आणि त्यानुसार दहा लाख 18 हजार 856 गायींनी 35 कोटी 38 लाख 49 हजार 620 लिटर दूध पुरवठा केला आहे. Milk Business Plan

पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत दररोज 50 रुपये जमा करा आणि मिळवा 35 लाख रुपये

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वेळेत मिळेल यासाठी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि सहकार विभागाने संयुक्तपणे या योजनेची अंमलबजावणी केली आहे. ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्राप्त अर्जाची छाननी करून जिल्हा नियोजन समिती आणि सहकारी व खाजगी प्रकल्प आणि माहिती भरण्यासाठी लॉगिन आणि युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आली.

हे सर्व नियोजन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या पाच रुपये प्रति लिटर अनुदानामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भूमिका पाहायला मिळाली. यामुळे त्यांना मिळणाऱ्या दुधाच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, पहा आजचा शासन निर्णय

या योजनेचा दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पात्र शेतकऱ्यांपर्यंत अनुदानाची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. सरकारच्या या योजनेचा राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल अशी आशा सरकारला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाचे 176.92 कोटी रुपये जमा! तुम्हाला मिळाले की नाही पहा येथे”

Leave a Comment