या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathwada Rain Update : राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्र पासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे 75% शेतकऱ्यांची सोयाबीन आणि कापूस पिकांची पेरणी झालेली आहे. या पिकांना रोगराई पासून दूर ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. Marathwada Rain Update

हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच मराठवाडा बाबत भारतीय हवामान खात्याने नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाडा कृषि विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवेला प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आठ जुलै रोजी बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी आजपासून नवीन नियम लागू आता यांनाच मिळणार मोफत रेशन

तसेच भारतीय हवामान खात्याने नांदेड जिल्ह्यामध्ये तळ ठिकाणी वादळ वारा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाड्यामध्ये दिनांक 5 ते 11 जुलै व बारा ते 18 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मराठवाड्यामध्ये दिनांक 10 ते 16 जुलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी किमान तापमान सरासरीपेक्षा एवढे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच मराठवाड्यामध्ये ज्या तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यास त्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. तसेच मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी सर्वसाधारणपणे 15 जुलै पर्यंत सर्व खरेदी पिकांची पेरणी करता येते असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महोत्सव केंद्रातील तज्ञांनी दिलेला आहे.

Leave a Comment