Mandhan Yojana online registration: देशातील शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमी नवीन योजना राबवत आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार अनेक योजना आखात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आज तुम्हाला अशीच आम्ही एका योजना बद्दल माहिती सांगणार आहोत जी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार नवनवीन योजना राबवित आहे. या योजनांपैकी एक योजना म्हणजे ‘ किसान मानधन योजना’ या योजनेअंतर्गत वयाची साठ वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांना वयोवृद्ध झाल्यावर शेतीमध्ये काम करण्यास त्रास होत आहे. व यानंतर त्यांना आर्थिक मदतीसाठी दुसऱ्यावर अवलंबून व्हावा लागतो.
ही गोष्ट केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘किसान मानधन योजना’ सुरू केली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही सरकारद्वारे 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे उद्देश म्हणजे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना पेन्शन द्वारे सामाजिक सुरक्षा प्रधान करणे होय.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरम्या तीन हजार रुपये देण्याची तरतूद सरकारने केली आहे. व लाभार्थी शेतकरी कोणतेही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत.
दरमहा भरा 55 रुपये व मिळवा 3000 रुपये प्रति महिना:
18 ते 14 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेसाठी नोंदणी करू शकतात, शेतकरी नाही या योजनेसाठी दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहे. यानंतर वयाची साठ वर्षे ओलांडल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक महिना 3,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जात आहे. या योजनेद्वारे शेतकरी आपल्या आर्थिक गरजा भागून शकणार आहेत.
असा करा अर्ज :-( Mandhan Yojana online registration)
अर्ज करण्यास पात्र शेतकऱ्याकडे आधार कार्ड ,मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज ,फोटो ओळखपत्र ,वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक, इत्यादी डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. या योजनेला अर्ज करण्यासाठी पात्र शेतकऱ्याला सर्वप्रथम किसान मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला होम पेज मध्ये जाऊन लॉगिन करावे लागणार आहे.
लॉग इन केल्यानंतर शेतकरी त्यांचा मोबाईल नंबर टाकावा. यानंतर पात्र शेतकऱ्यांनी त्यांची आवश्यक माहिती भरावी. आवश्यक माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट ऑप्शन वर क्लिक करावा. यानंतर तुमच्या नोंदणी करून मोबाईल नंबर एक ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी रिक्त बॉक्स मध्ये टाकावा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करावे लागणार आहे.