Maharashtra Rain Alert : राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेले काही दिवसापासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेती पिकांच्या नुकसान केलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत देखील पावसाने मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि वित्तहानी केली आहे. त्याच्यामुळे नागरिक मोठे परेशान झाले माहिती समोर आली आहे. Maharashtra Rain Alert
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होणार असा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. यासोबत विदर्भातील देखील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यात होणार वादळी पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सिंधुदुर्ग, नंदुरबार, रत्नागिरी हे जिल्हे वगळता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, हिंगोली तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.