LPG Cylinder Price: नमस्कार मित्रांनो, आज आठ मार्च आहे म्हणजे राष्ट्रीय महिला दिन यानिमित्त आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना मोठा गिफ्ट दिल आहे. महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे गॅसच्या किमतीमध्ये सरकारने तब्बल शंभर रुपयाची कपात केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. यापूर्वी सुद्धा रक्षाबंधनच्या दिवशी मोदी सरकारने गॅस सिलेंडर स्वस्त केले होते.
आज सायंकाळी मोदींनी स्वीट करत म्हटलं आज महिला दिन आमच्या सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल विशेषतः आपल्या नारी शक्तीला याचा फायदा होईल.
स्वयंपाकाचा गॅस अधिक स्वस्त करून आम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुचित करण्याचे देखील ध्येय ठेवले आहे. हे महिलाचे सक्षमीकरण आणि त्यासाठी अजय ऑफ लिविंग या सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचन पद्धतीशी सुसंगत आहे.
सध्या काय आहे सिलेंडरची किंमत | LPG Cylinder Price
या अगोदर गॅस सिलेंडरची किमती 1100 वर गेल्या होत्या, मात्र ग्राहकाच्या नाराजी मुळे मोदी सरकारने सिलेंडरवर दोनशे रुपयाची सबसिडी जाहीर केली होती. त्यानंतर 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडर किंमत 903 रुपये झाली. कोलकात्यामध्ये 929 रुपये आहे, मुंबईत 902.50 रुपये आहे आणि चेन्नई 918.50 रुपये इतकी आहे. आता मोदीच्या घोषणेनंतर या दरात आणखीन 100 रुपये कपात होणार आहे. म्हणजे तुम्हाला आठशे रुपयांच्या आसपास गॅस सिलेंडर खरेदी करता येणार आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे ग्रहणींना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएम उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये अनुदान येत होते म्हणजे त्यांना गॅस सिलेंडर 603 रुपयाला मिळत होते. त्या ग्राहकाला आता गॅस सिलेंडर फक्त 503 रुपयाला मिळणार आहे.
हे पण वाचा:- रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आता 15 मार्चपासून लागू होणार नवीन नियम, मोफत रेशनसोबत या 6 गोष्टी मिळणार..!