लिंबाच्या दारात मोठी वाढ..! आवक घटल्यामुळे आणखीन वाढ होण्याची शक्यता, पहा आजचे लिंबाचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lemon Price Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाने अंगाची काहीली होत आहे. अशातच शरीरातील ऊर्जाच्या पातळीत समतोल राखण्यासाठी आहारातील प्रमुख घटक म्हणजे लिंबू असे मानले जाते. त्यामुळे लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र बाजारात सध्या लिंबाची आवक घटल्याने लिंबाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या दरामुळे नागरिकांना लिंबू अधिकच आंबट झाल्याचे चित्रे बाजारात दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील आजचे लिंबाचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गेला काही दिवसापासून तापमान मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या रखरखत्या उन्हात लिंबू पाण्याचा प्रत्येक घोट अमृततुल्य वाटतो. मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आणि उन्हाळ्यात झटपट ताजेतवाने करणारे लिंबू आता खूप महागले आहे. Lemon Price Today

सध्याच्या कडक उन्हाळ्यात डॉक्टर देखील लिंबू शरबत पिण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे लिंबाला मागणी वाढत आहे. उन्हाळ्यात सर्वात जास्त चालणारा उसाचा रस त्यात देखील लिंबू लागतच मात्र आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे किंमत जास्त असल्याने लिंबाने सर्वांनाच घाम पडला आहे. लिंबाचे भाव वाढल्याने लिंबू सरबत चे भाव देखील आपोआप वाढले आहेत.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, पहा आजचा शासन निर्णय

इन उन्हाळ्यात बाजारात लिंबूचे व घटल्याने काही दिवसापूर्वी अगदी दहा रुपयांनी चार ते पाच लिंबू मिळत होते तेच लिंबू आता दहा रुपयांनी दोन मिळत आहेत. त्याचबरोबर आकारमानानुसार लहान लिंबू पाच रुपयांना तर मोठे लिंबू सात ते दहा रुपयांना मिळत आहे. लिंबाच्या दराने एन उन्हाळ्यात उसळी घेतल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना लिंबू आता परवडत नाहीये.

आजचे लिंबाचे भाव

  • मोठे लिंबू— 7-10 रुपयाला एक
  • छोटे लिंबू — 5-6 रुपयाला एक, दहा रुपयाला दोन

1 मे पासून फक्त याच लोकांना मिळणार मोफत राशन..! शिधापत्रिकांची नवीन यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा

लिंबू सरबत चा भाव

  • हाफ ग्लास — 10 रुपये
  • फुल ग्लास — 15 रुपये

काही दिवसापूर्वी दोन हजार रुपयाला लिंबाची गोणी मिळत होते. मात्र आता तीच गोणी मार्केटमध्ये 2400 ते 2700 रुपयांना मिळत आहे. परिणामी किरकोळ बाजारात लिंबाची मागणी वाढत चालली आहे. हॉटेल धंदेवाल्यांना, घरगुती खानावळील वाल्यांना, रसवंती वाल्यांना व लिंबू सरबत वाल्यांना कितीही किमती वाढल्या असल्या तरी लिंबू खरेदी करणे आवश्यक आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लिंबाच्या दारात मोठी वाढ..! आवक घटल्यामुळे आणखीन वाढ होण्याची शक्यता, पहा आजचे लिंबाचे भाव”

Leave a Comment