लेक लाडकी योजना अंतर्गत आता मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये ..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana : महाराष्ट्र सरकार नेहमीच मुलींच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवित आहे. आता महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, महाराष्ट्रातील एक एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजना अंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये ची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस बचत बँकेचे खात्यातून घेता येणार आहे. अशी माहिती पुणे ग्रामीणचे अधिकार कृष्ण एरंडे यांनी दिली आहे. या योजनेचे माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे हा सरकारचा हेतू आहे. मुलींच्या शिक्षणात चालना देणे, व मुलींचा मृत्यू तर कमी करणे, तसेच बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे ,शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे ,यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राज्यात राबवली जात आहे.

पाच टप्प्यात मिळणार 1 लाख 1 हजार रुपये :

व्हिडिओ किसी राशन कार्ड धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना प्रथम जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, 6 गेल्यावर सात हजार रुपये , अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये, अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा पद्धतीने एकूण मुलीस एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे. ती रक्कम शासनामार्फत थेट लाभार्थीच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे.Lek Ladki Yojana

या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत ..?

प्रथम लाभार्थ्यांचा जन्म दाखला, कुटुंबप्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा, लाभार्थीचा आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, पोस्ट ऑफिस बचत बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, ही सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविकाकडे पोहोचण्यासाठी चा अर्ज व कागदपत्रे तपासून घेतल्यानंतर त्याची नोट सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे. यानंतर तो अर्ज संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे, मग सदरील अर्ज अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकारी कडे पाठवायचा आहे .

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आहे :-

या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकीकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करताना तुम्हाला वर दिलेली सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे अंगणवाडी सेवेकडे द्यायचे आहेत सर्व कागदपत्र योग्यरीत्या दिल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

या लाभार्थ्यांनाच मिळणार लेक लाडकी योजनेचा लाभ :-

1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. व पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पिताने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करायचे आहे.

हे पण वाचा : या योजनेअंतर्गत मिळणार मोफत गॅस सिलेंडर…! कोणती आहे योजना.?

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा