Ladki bahin Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अशी योजनेची अंमलबजावणी केली आहे. ही योजना आता पूर्णपणे लागू झालेली आहे. आणि अशातच महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेबद्दल काही निर्णय घेतलेले आहेत या निर्णयामध्ये कोणकोणते बदल होण्याची शक्यता आहे हे आपण यामध्ये जाणून घेऊया.
मुख्यमंत्री वयोश्री योजना ! जाणून घ्या पात्रता, लाभ व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे माहिती.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात केलेली आहे. आणि याच योजनेच्या द्वारे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये हे दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने काही दिवसापूर्वीच या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुद्धा ही वाढवलेली होती. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भामध्ये अजून काही महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेमध्ये अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जातील. असा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे. महिला व बाल कल्याण विकास विभागाकडून या संदर्भातल शासन निर्णय हे जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने नेमके काय निर्णय घेतले आहेत?
महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबतचे काही शासन निर्णय हे जारी केले आहेत. या शासन निर्णयानुसार या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ ही अंगणवाडी सेविकांवरच अवलंबून असेल. यापूर्वी या योजनेचे अर्ज हे मंजूर करण्याचं काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेले होते. पण मात्र, यामध्ये आता केवळ अंगणवाडी सेविकांना या अर्जाची मंजुरी करून देण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेले आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना ! जाणून घ्या पात्रता, लाभ व आवश्यक कागदपत्रांसह पूर्णपणे माहिती.
नवीन शासन निर्णयानुसार केवळ अंगणवाडी सेविका या अर्जाची मंजुरी करून देऊ शकतात. गेल्या काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज हे दाखल केल्याचे प्रकरण समोर आलेलं आहे. या संबंधित व्यक्तींना त्याच्या पत्नीच्या नावाची 30 अर्ज दाखल केलेले होते. त्यापैकी 26 अर्जाची मंजुरी झाली मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेमध्ये गैरप्रकार हा पुन्हा होऊ नये. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललेल्यामुळे असे कारणे समोर आले आहेत. व या योजनेतील सप्टेंबर महिन्यांमधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजुरी करून दिली जाईल.
किती महिलांना या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जुलै व ऑगस्ट अशा दोन टप्प्यांमध्ये 1 कोटी 59 लाख महिलांना 4 हजार 787 कोटींचा लाभ हा देण्यात आलेला आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत चालू राहील.
1 thought on “Ladki bahin Yojana: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये झाले बदल, शासनाने जारी केले निर्णय!”