उन्हाळ्यामधील या गोष्टींकडे लक्ष द्या, व शेळ्या ह्या निरोगी ठेवा; यामुळे शेळ्यांचे नुकसान देखील होणार नाही व फायदा देखील होईल..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goat farming: नमस्कार शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्या मधील अनेक जिल्ह्यातील, तालुक्यामधील व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय करत असतात. आणि अशातच उन्हाळा हा ऋतू असल्याने शेळ्यांना या उन्हाचा खूप फटका बसतो. या कारणाने शेळ्यांना रोगांचे हे लक्षण होऊ शकतात. व उन्हामुळे शेळ्यांना दुखणे सुद्धा येऊ शकतात. तर यामध्ये काही टिप्स वापरून तुम्हाला ह्या शेळ्यांना निरोगी कशा प्रकारे ठेवता येतील ते यामध्ये जाणून घेऊया.

शेळीपालन आता हा व्यवसाय अनेक शेतकरी हे त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनामधून करत असून, नव्याने शेतीचा व्यवसाय सुद्धा नशीब आजमावण्यासाठी आलेले व अनेक उच्चशिक्षण तरुण सुद्धा या शेळीपालन व्यवसायाकडे वळवलेले आहेत. आणि कमीत कमी या व्यवस्थापनामध्ये व कमी खर्चामध्ये चांगला आर्थिक नफा देण्याची क्षमता सुद्धा या व्यवसायामध्ये आहे.

हे पण वाचा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खांदण्यासाठी मिळणार, 100 टक्के एवढे अनुदान..!

जर तुम्हाला या शेळीपालना मधून चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा हा मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला शेळ्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे देखील तेवढेच गरजेचे असते. आणि या उन्हाळ्याची सुरुवात झाली असल्यामुळे काही विशेष काळजी घेणे हे खूप आवश्यक आहे. कारण आता प्रत्येक दिवसाला तापमानामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या तापमानात देखील वाढ होण्याची दाट शक्यता असते.

या कालावधीमध्ये जर शेळी असली किंवा कुठलेही जनावर आसले तरी याकरिता पाणी व हिरव्या चाऱ्याची गरज ही वाढते. नेमके उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा हा उपलब्ध होत नसल्यामुळे, शेळ्यांना आवश्यक असलेली जी पोषक तत्वे असतात ती भेटणं या उन्हाळ्यामध्ये कठीण होते. आणि शरीरामध्ये या पोषक तत्त्वांची कमतरता पासून जनावरांना व शेळ्यांना अनेक प्रकारचे आजार हे होऊ शकतात.Goat farming

उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची काळजी ही अशा प्रकारे घ्यावी.

  • जर शेळ्या मोठ्या प्रमाणावर झाडपाला खात असतात, यासाठी शेळ्यांच्या आहारामध्ये प्रत्येक दिवसाला पाच किलो हिरवा चारा आणि एक किलो वाळलेला साऱ्यांचा समावेश हा करावा.
  • शेळ्यांच्या मांस वाढीकरिता आवश्यक असलेले पोषक घटक या चाऱ्याद्वारे त्यांना मिळावे, यासाठी चाऱ्यांमध्ये क्षार मिश्रण व प्रतिजैविक मिसळून चारा त्यांना खायला द्यावा.
  • या चाऱ्यांबरोबर जर विकारांचा वापर केला, तर या चाऱ्याची पचनियता ही सुद्धा वाढते. म्हणून शेळ्याच्या शरीराला पौष्टिक घटक मिळण्यासाठी मदत ही होते. आणि त्याचा सकारात्मक परिणाम हा शेळ्यांच्या उत्पादनामध्ये होतो.
  • प्रोबायोटिक चा वापर हा केला तर ओटी पोटाला आवश्यक असलेले जे सूक्ष्मजीव असतात ते मिळतात. त्यामुळे पचनक्रिया ही वेगाने होते. आणि मांस उत्पादन सुद्धा वाढते. व शेळीची प्रकृती देखील अतिउत्तम प्रकारे राहते.
  • आहारामध्ये चार या मिश्रणाचा वापर केला तर, पोषक घटकांच्या कमारतेचे आजार हे हळूहळू कमी व्हायला मदत होते. व मांस उत्पादन सुद्धा वाढते. आणि या सोबतच प्रतिजैविक हे वापरले तर या शेळ्यांची रोगप्रतिकारक क्षमता हे देखील वाढते. आणि शेळ्या ह्या आजारी पडत सुद्धा नाहीत.
  • उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे दुपारी 11 ते 4 या वेळेत भरपूर उन्हाचे प्रमाण असते, त्यामुळे शेळ्यांमध्ये उष्णता जास्त होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून त्यांना लवकर सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये चरण्यासाठी सोडावे व संध्याकाळी चार ते सात ही वेळ ठेवावी.
  • जेवढे शक्य असेल तेवढे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये शेडमध्ये चाऱ्यांची व्यवस्था ही करावी. विनाकारण शेळ्यांना लांबपर्यंत चरण्यासाठी घेऊन गेला तर अशा या दूरवरच्या फिरण्यामुळे शेळ्यांच्या शरीराला गरजेप्रमाणे पोषक हे भेटत नसल्यामुळे शेळ्यांची प्रकृती ही बिघडू शकते.
  • शेळ्यांना स्वच्छ व थंडगार पाणी प्यायला द्यावे व 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल एवढी सोय करावी.
  • शेळ्यांना शेडमध्ये पुरेशी व जास्तीत जास्त जागा मिळेल, याप्रमाणे सोय हे करावे. असे केल्याने शेडमधील तापमान सुद्धा वाढत नाही.
  • उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या लेड्यांपासून अमोनिया जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडतो. यामुळे शेड मधील हवा ही खेळती राहणे खूप गरजेचे असते.
  • शेळ्यांचे केस हे लांब वाढलेले असतील तर ते कापून टाकावेत.
  • आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत शेळ्यांना लाळ्या खुरकू व घटसर्प, आंत्रविषार यासारख्या रोगांचे लसीकरण करून घेणे हे आवश्यक असते. लसीकरणाच्या दोन दिवस अगोदर व नंतर इलेक्ट्रॉनिक पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे. यामुळे लसीकरण केल्याचा ताण हा शेळ्यांवर जास्त होत नाही.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “उन्हाळ्यामधील या गोष्टींकडे लक्ष द्या, व शेळ्या ह्या निरोगी ठेवा; यामुळे शेळ्यांचे नुकसान देखील होणार नाही व फायदा देखील होईल..!”

Leave a Comment