Free Education : चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या शिक्षणा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. जून महिन्यापासून राज्यातील ज्या मुलींच्या पालकाचे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना शिक्षण मोफत दिले जाणार आहे.
मुलीचे शिक्षण संदर्भात आनंदाची बातमी समोर आली आहे. येणाऱ्या जून महिन्यापासून राज्यातील ज्या मुलींच्या पालकाचे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल अशा मुलींना मेडिकल , इंजिनिअरिंग अशा जवळपास 600 अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
उत्तर महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील गेले असताना. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे, या योजनेअंतर्गत 600 वेगवेगळ्या अभ्यासक्रम घेण्यात आले आहे. त्याचबरोबर इंजीनियरिंग मेडिकल यासारखे अभ्यासक्रमांना पालकाचे लाखो रुपये खर्च होतात मेडिकल साठी तर करोड रुपये लागतात त्यामुळे सामान्य घरातील मुली शिकू शकत नाहीत . या नवीन योजनेमुळे आता सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची दारे उघडे होणार आहेत.Free Education
चंद्रकांत पाटील यांनी या घोषणा वेळेस सांगितले की सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात 50 टक्के सूट दिली जात आहे परंतु आता यापुढील मुलींना शिक्षण सवलतीत 100% टक्के सूट देण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील म्हणले की उच्च शिक्षणातील विविध खर्चासाठी मोठ्या संख्येने मुलींनी प्रवेश घ्यावे यासाठी विद्यापीठाची प्रयत्न करायला हवेत.
त्याचबरोबर राज्य सरकारच्या याने निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छित करणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे त्यामुळे मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्या वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. या बैठकीदरम्यान राज्यपाल रमेश बैस हे देखील उपस्थित होते.
हे पण वाचा:
तुरीच्या भावात झाली घसरण..! पहा आजचे महाराष्ट्र राज्यातील तुरीचे बाजारभाव