अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या पैशाची वाटप सुरू; पैसे भेटण्यासाठी करा आजच हे काम..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flood Damage Compensation: नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत, अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई चे पैसे वाटप सुरू होत आहे. आणि अशाच नुकसान भरपाई चे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला आजच हे काम करावे लागेल, तर जाणून घ्या यासाठी काय करावे लागेल.

या अतिवृष्टी नुकसान भरपाई ही अवकाळी पाऊस व गारपीट आणि तसेच दुष्काळी अनुदान अशा या योजनेच्या पैशाची वाटप आता खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई असो व इतर नुकसान भरपाई आतापर्यंत असे अनेक प्रकारचे जीआर हे काढण्यात आले आहेत. परंतु यामध्ये एक दमडीही शेतकऱ्यांच्या हाती लागलेली नाही.

काही प्रोसिजर यामध्ये असतात 2021 मधील या अतिवृष्टी नुकसान भरपाई जर आता वाटप करत असेल, तर या वर्षी सुद्धा या नुकसान भरपाईचे पैसे यंदा मिळणार आहे का ? असे अनेक सारे प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत असतात. 2023 मधील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान हे हळूहळू जमा झालेले आहेत.

हे पण वाचा, 1200 रुपये किलो विकत ‘या’ कोंबडीचं चिकन; तर, एक अंडे 50 रुपयाला..!

2023 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या शेतकऱ्यांना तात्काळ एका महिन्याच्या आत मध्ये मदत देणार अशी घोषणा आपल्या राज्यात देखील करण्यात आली होती. परंतु त्यासाठी आता थोडा वेळ हा सोसावा लागला, परंतु आता वाटप ही सुरू आहे. 2023 मधील वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुदानाविषयीचे जीआर निर्गमित करण्यात आलेले आहेत.

पण कोणत्याही जीआरचे पैसे हे वाटप आतापर्यंत झाले नसल्यामुळे आता पैसे वाटपाला सुरुवात ही झालेली आहे.

आणि जर आपल्याला देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळवायचे असेल, तर आपल्यालाही केवायसी करणे हे खूप आवश्यक आहे. तरच आपल्या अकाउंट वरती हे अतिवृष्टी भरपाईची रक्कम येण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा हा निर्माण होणार नाही.Flood Damage Compensation:

शेतकरी मित्रांनो जर यामध्ये एकंदरीत मागील काही दिवसांमध्ये आचारसंहिता ही लागण्यापूर्वीच आपली रक्कम मंजूर झालेली असेल, आणि फक्त जर सरकारकडे बजेट येण्याची जर प्रतीक्षा असेल, आणि बजेट जर जमा झालेले असेल, तर आपल्या खात्यामध्ये आचारसंहिता मध्ये देखील पैसे येण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा हा येणार नाही. या आचारसंहितेमध्ये देखील अतिवृष्टी नुकसान किंवा इतर नुकसान भरपाई दिले जाऊ शकते.

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 32 जिल्ह्यांना पात्रता ही देण्यात आलेली होती यामध्ये जिल्हा परभणी, छत्रपती संभाजी नगर, यवतमाळ, अमरावती, भंडारा, वर्धा, सोलापूर, गोंदिया, पुणे, जळगाव, अहमदनगर असे हे जिल्हे मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट व पात्र करण्यात आलेले होते. या सर्व जिल्ह्यांसाठी 2240 कोटी रुपयांची रक्कम ही वितरणासाठी मंजूर झालेली होती.

ज्या ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी क्लेम केलेले आहेत, व त्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहेत. त्यांना त्यांच्या मोबाईल वरती एक मेसेज मिळाला असेल, त्या मेसेजच्या माध्यमातून सांगितले असेल की आपली अतिवृष्टी नुकसान भरपाई हे आपल्याला मंजूर झालेली आहे.

या सर्व शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे हे अतिशय गरजेचे आहे. यामध्ये आपण आपले आधार कार्ड व्हेरिफिकेशन, बँक अकाउंट, पासबुक, झेरॉक्स व्हेरिफिकेशन अशा काही मूलभूत गोष्टींची पडताळणी करणे हे गरजेचे आहे. आणि आपला मोबाईल क्रमांक आपल्या बँक खात्याची लिंक आहे का? अशा छोट्या-मोठ्या गोष्टींची पडताळणी करून सबमिट करावे.

अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment