Drought: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या शेतकऱ्यांना नाही मिळणार दुष्काळ निधी, पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) केलेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांना दुष्काळ निधीपासून वंचित राहावे लागणार आहे. दुष्काळ निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी (KYC) शिकलेली नाही त्या शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळणार नाही.

पुरंदर तालुक्यातील 56 हजार शेतकऱ्यांना 34 कोटी 56 लाख रुपयांचा दुष्काळ निधी मंजूर झाला आहे. हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अजूनही बँक खात्याची केवायसी (KYC) केलेली नसल्यामुळे दुष्काळ निधीची रक्कम बँक खात्यात जमा होत नाही.

बँक खात्याची केवायसी (KYC) करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केले नाही, त्या शेतकऱ्यांनी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, संगणक कर्मचारी यांना भेटून आपली नोंद झाली का नाही ते तपासून तातडीने बँक खात्याची केवायसी करून घ्यावी. जेणेकरून दुष्काळ निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ताबडतोब जमा होण्यास सुरुवात होईल. आणि शेतकरी दुष्काळ निधी पासून वंचित राहणार नाहीत. Drought

चालू वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेले असून, असे अडचणीचे काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावोगावी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 56 हजार शेतकऱ्यांची नोंदी झाली असून राहिलेल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

आज सोन्याच्या भावात झालेली घसरण ऐकून तुम्ही आनंदाने उडी माराल, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

दुष्काळ निधीसाठी पात्र सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. पुरंदर तालुक्यातील जिराईत क्षेत्र 21216.4 हेक्टर इतके असून या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या 21120 एवढी आहे. येथील शेतकऱ्यांना प्रत्येक तरी 8500 रुपये याप्रमाणे 18 कोटी 10 लाख 19 हजार 400 रुपये एवढे अनुदान मंजूर झाले आहे. तसेच वागायची क्षेत्र 4800 हेक्टर असून शेतकऱ्यांची संख्या 13480 एवढी आहे.

बागायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 17 हजार रुपये याप्रमाणे 8 कोटी 16 लाख रुपये एवढे अनुदान मंजूर झाले आहे. बहुवार्षिक क्षेत्र 3692 हेक्टर एवढे आहे तर 11400 एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे. यासाठी प्रति एक तरी बावीस हजार पाचशे रुपये याप्रमाणे 8 कोटी 30 लाख 63 हजार अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “Drought: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या शेतकऱ्यांना नाही मिळणार दुष्काळ निधी, पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment