Drought: आता जसा जानेवारी महिना हा संपला, तसा फेब्रुवारी महिना सुद्धा संपत आला आहे. आणि अशाने दुष्काळ परिस्थिती ही आता पडत आहे. कारण, यावर्षी पावसाळ्या ऋतूमध्ये पाऊस हा कमी पडल्याने दुष्काळी परिस्थिती पडलेली आहे.
आता या दुष्काळी परिस्थितीचा लाभ हा मिळावा यामुळे शासन दुष्काळसदृश जाहीर करत असते. या जाहीर केलेल्या महसूल मंडलाच्या व्यतिरिक्त त्यामध्ये विभाजन करून नव्याने करण्यात आलेल्या मंडलातही आता दुष्काळसदृश्य परिस्थिती ही शासनाने जाहीर केलेली आहे.
19 जिल्ह्यातील 224 मंडलांचा यामध्ये समावेश आहे. तसेच आधीप्रमाणे नव्याने जारी केलेल्या या दुष्काळ सदृश मंडलात सर्व सवलती या तातडीने लागू केलेल्या आहेत.
हे पण वाचा, महाराष्ट्र राज्यातील हळदीच्या भावामध्ये झाले बदल; जाणून घ्या आजचे महाराष्ट्र राज्यातील बाजार भाव !
पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ स्थिती असलेल्या 40 तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये शासनाने ही दुष्काळ स्थिती जाहीर केलेली आहे. व त्यानंतर पुन्हा टंचाई असलेल्या आणि ज्या महसुली मंडलांत जून ते सप्टेंबर, 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिलिमीटरपेक्षा कमी झालेले आहेत.
याप्रमाणे अशा 1021 मंडलांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती ही जाहीर केली. तेथे सवलती या लागू केल्या आहे. आणि या 1021 मंडलांपैकी ज्या मंडलाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडले स्थापन करण्यात आलेली आहे. आणि त्या मंडलात अद्याप पर्जन्यमापक यंत्र हे अजून बसविण्यात आलेले नाही.DDrought
अशी नवीन महसुल मंडले देखील ही दुष्काळसदृश मंडले म्हणून जाहीर करावीत, असा आता निर्णय घेण्यात आलेला होता. व त्यानुसार 19 जिल्ह्यांपैकी 224 नवीन मंडले दुष्काळ सदृश घोषित केलेली आहेत. आणि नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळ सदृश मंडलात नगर जिल्ह्यातील सर्वाधिक 34, त्याच पाठोपाठ धुळ्यातील 23, आणि जळगावातील 24 मंडळांचा समावेश केलेला आहे.
तर, या सवलती लागू केलेल्या आहेत.
- जमीन महसुलामध्ये सूट
- सहकारी कर्जांचे पुनर्गठण
- शेतीशी निगडित असणाऱ्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या या चालू वीजबिलामध्ये 33.5% सूट
- शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये माफी
- रोहयोग अंतर्गतच्या कामाच्या निकषांमध्ये काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवण्यासाठीचा वापर
- शेतीपंपाची वीज जोडणी ही खंडित न करणे
पहा, जिल्हानिहाय जाहीर केलेली नवीन मंडले.
पुणे: १४, सातारा: 12, सांगली: 2, सोलापूर: 10, कोल्हापूर: 5, नाशिक: 13, जळगाव: 24, नगर: 34, नांदेड: 5, छत्रपती संभाजीनगर: 16, जालना: 3, परभणी: 13, हिंगोली: 7, लातूर: 6, बीड: 19, नागपूर: 5, वर्धा: 3