Dhananjay Munde: नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही आपल्या रानातील पिकाची ईपिक पाहणी हे केलीच असेल, आणि या ईपीक पाहणी नंतर तुम्हाला तुमच्या खात्यावरती अनुदान हे मिळत असते. अशाच कापूस व सोयाबीन या पिकाचे अनुदान मिळण्यासाठी शेतकरी हे वाट पाहत आहे. या अनुदानाची शेतकऱ्यांना गरज आहे आणि आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
पहा महाराष्ट्र राज्यातील कांद्याचे विक्रमी बाजार भाव, अखेर उन्हाळी कांद्याने 5 हजारांचा टप्पा गाठलाच!
अनुदान वाटत असताना येणाऱ्या अडचणी या लवकरात लवकर सोडून शेतकऱ्यांना पूर्णपणे अनुदान देण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष बैठक घेतलेली आहे.
या बैठकीमध्ये त्यांनी सूचना देखील केल्या आहे. पण पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही आहे. तर अशा शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ हा लवकरात लवकरच सुरळीत करून त्यांना अनुदान हे देऊन टाकावे. असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आव्हान केले.
पहा महाराष्ट्र राज्यातील कांद्याचे विक्रमी बाजार भाव, अखेर उन्हाळी कांद्याने 5 हजारांचा टप्पा गाठलाच!
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची कार्यपद्धती ही शासनाने 30 ऑगस्ट रोजी जाहीर केलेली होती. पण यामध्ये काही अडचणी कायम आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आढावा बैठक घेतलेली आहे, आणि या बैठकीला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयोग रवींद्र बिनवडे तसेच कृषी संचालक विजयकुमार आवटे ,माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी व कृषी विभागाचे संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
पहा महाराष्ट्र राज्यातील कांद्याचे विक्रमी बाजार भाव, अखेर उन्हाळी कांद्याने 5 हजारांचा टप्पा गाठलाच!
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने 2 हेक्टर पेक्षाही जास्त म्हणजेच 5000 रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 4 हजार 194 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1 हजार 548 कोटी रुपये व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहेत.