15 जुन अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75 टक्के पिक विमा जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance News | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अतिवृष्टी व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने मध्यंतरी 25 टक्के पिक विमा वितरित केला होता. राहिलेला ७५ टक्के पिक विमा कधी जमा होणार याबाबत माहिती समोर आली नव्हती. जुलै ऑगस्ट 2023 मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 50% पेक्षा जास्त पिक विमा शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात आला होता त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये अग्रीम 25 टक्के पिक विमा ही रक्कम देण्यात आली होती. Crop Insurance News

गावानुसार घरकुल यादी जाहीर; यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

पिक विमा कधी मिळणार

शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी विमा कंपन्यांनी विरोध केला होता. पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देण्यामध्ये नकार देत आहे त्यांनी सांगितले आहे की जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला असला तरी पिकांची कुठेही नुकसान झाले नाही. म्हणून अग्रीम रक्कम देण्यासाठी नकार दिला होता. परंतु या प्रकरणी केंद्र समितीकडे अपील करण्यात आले होते. यानुसार आता केंद्रीय समितीने विमा कंपनीच्या बाजूने निकाल दिला. त्यांच्यामध्ये पिक विमा कंपनीच्या प्रयोगा नंतर अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात येणार आहे आणि त्यानुसार पिक विमा रक्कम देण्यात येणार आहे केंद्रीय समितीच्या निकालानुसार जिल्ह्यांना रक्कम मिळणार नाही अशी देखील सांगण्यात आले आहे.

अशा परिस्थितीमध्ये ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50 टक्के पक्षा कमी आहे त्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून उर्वरित 75 टक्के पिक विमा वितरित करण्याची शासनाची भूमिका असल्याची स्पष्ट सांगण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांना आधीच 25% रक्कम वितरित करण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून उर्वरित 75 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

परंतु परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये जवळपास सर्वच भागात पावसाचा खंड पडले नाही शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून न्याय मिळणे व योग्य भूमिका घेणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांवरती मोठे संकट कोसळेल शेतकरी आर्थिक संकटात सापडेल.

Leave a Comment