Crop Insurance Claim: नमस्कार शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी या फळपीकाचा विमा उतरवला आहे अशांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक दिलासादायक बातमीची घोषणा केलेली आहे यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या फळ पिकाचे नुकसान भरपाई चे 125 कोटी रुपये हे भेटणार असे आवाहन केले आहे तर याबाबतची माहिती जाणून घ्या.
हवामान आधारित या फळपीक विमा योजनेमधील महाराष्ट्र सरकारच्या हिष्यांची सुमारे 52 कोटी 66 लाख रुपयांचा विमा हप्त्याची रक्कम ही संबंधित विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे. तर मागील तीन हंगामामधील या आंबिया बहारातील ही रक्कम विमा कंपन्यांना भेटल्याने थकीत देय असलेली विम्याची सुमारे 125 कोटींची फळपीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये ही रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा भेटणार आहे.
पी एम किसान लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांच्या या पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे हे आर्थिक स्थैर्य अभातीमध्ये राहण्यास मदत होते व त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्राधान्य ने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही राबवण्यात येत आहे. Crop Insurance Claim
हे पण वाचा, उन्हाळ्यामध्ये माठातलं पाणी लवकर गार होण्यासाठी करा एक खास ट्रिक; यामुळे फ्रिज सारखं गार पाणी होईल..!
महाराष्ट्रामध्ये सण 2021-22, 2022-23 व 2023-24 या वर्षांमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष या प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमधील महसूल मंडळ हा घटक धरून राबवण्यात येत आहे .मागील तीन आंबिया बहार व एक मृग बहारातील फळपीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांना देणे अजून बाकी होते.
महाराष्ट्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना योजनेपोटी द्यावयाचा 52.66 कोटी रुपयांचा विमा हप्ता हा नुकताच दिलेला आहे. व त्यामुळे 1 लाख 97 हजार 565 शेतकऱ्यांना देय असलेली विम्याची सुमारे 125 कोटी रुपयांची रक्कम लवकरच शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून वितरित होणे अपेक्षित असल्याची माहिती ही कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.