crop insurance: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या दिलेल्या माहितीनुसार, सन 2023 या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194 कोटी रुपयाचा अर्थसहाय्य निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. या अडचणी महा आयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडून शेतकऱ्यांना या सप्टेंबर महिन्यामध्ये अर्थसाहाय्य थेट त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे निर्देश हे जारी केले आहेत.
महाराष्ट्र मुख्यमंत्री योजनादुतमध्ये काम केल्याने दरमहा 10,000 रुपये, सोबत मिळतील हेही फायदे!
यामध्ये सन 2023 या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य म्हणून वाटपात येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक ही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली व दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी व इतरत्र कृषी विभागाचे सर्व संबंधित अधिकारी या दुरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
महाराष्ट्र मुख्यमंत्री योजनादुतमध्ये काम केल्याने दरमहा 10,000 रुपये, सोबत मिळतील हेही फायदे!
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे म्हणाले आहे की, 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये व 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये 5 हजार अर्थसाहाय्य हा मंजूर करण्यात आलेला आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646 कोटी रुपये असे एकूण 4 हजार 194 कोटी रुपयांचा अर्थसहाय्य निधी मंजूर करण्यात आलेला आहे. असे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या माहितीस्तव सांगितले आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री योजनादुतमध्ये काम केल्याने दरमहा 10,000 रुपये, सोबत मिळतील हेही फायदे!
2023 च्या खरीप हंगामाच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर देण्याबाबतची कार्यपद्धती ही 30 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने जाहीर केलेली आहे. धनंजय मुंडे यांनी 2023 सालच्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा ही केलेली होती. व त्यानुसार नुकत्याच झालेल्या या अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे. यामध्ये आता सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे.
1 thought on “राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे 20 हजार रुपये अनुदान होणार जमा, पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव पहा!”