Cow Farming: एका वेतामध्ये कोणती गाय देते तब्बल 3,000 लिटर दूध ? तर पहा ती गाय कोणती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cow Farming: भारत देशामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय प्रामुख्याने चालतो व शेती व्यवसाय सोबतच एक व्यवसाय म्हणून पशुपालन हा देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो.

या शेतीसोबतच गाई, म्हशींचे संगोपन केले जाते. कारण, या गाईन, म्हशीं पासून आपल्याला प्रामुख्याने उत्पन्न भेटत असते. अशातच प्रामुख्याने एक गायची चांगली चर्चा होतेय तर ती गाय कोणती आहे हे आपण यामध्ये पाहून घेऊया.

महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधाला बाजारामध्ये अपेक्षित असा प्रमाणे भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हा दुधाचा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय हा परडवत नाही, असे म्हटले जात आहे. यामुळे शासनाने आता गाई, म्हशींच्या दुधाला 5 रुपये प्रति लिटरचे अनुदान दिले आहे. म्हणून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दुधाच्या धंद्याचा चांगलाच लाभ होईल.

यामध्ये खाजगी आणि सरकारी दूध संघाकडे या दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा चांगल्या प्रकारे फायदा (लाभ) मिळणार आहे.

शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना या 5 रुपये प्रति लिटर अनुदानाचा निर्णय घेतल्यामुळे चांगलाच दिलासा मिळेल, आणि काही महिन्यापासून हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना या दुग्ध व्यवसायामध्ये फारच नुकसान हे सहन करावा लागले होते.

हे पण वाचा: दुध उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी, हे करा तीन घरगुती उपाय..!

जर या दूध व्यवसायामधून चांगल्या प्रकारचे जर उत्पादन मिळायचे असेल, तर गाई, म्हशींच्या आहाराचे चांगले संगोपन केले पाहिजे. व त्यांचा खुराक हा वेळेवर दिला पाहिजे. यामुळे गाई, म्हशी आपल्याला चांगल्या प्रकारचे दूध देत असतात.

आणि हा व्यवसाय सुरू करण्याआधी कोणत्या गाई आपण घेतल्या पाहिजे याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि ज्या जातीच्या गाई जास्त दूध देत असतात, अशाच गाईंचे जास्त संगोपन करणे आवश्यक आहे. आता आपण यामध्ये अशाच एका जातीच्या गायीची माहिती घेणार आहोत. की, ती तब्बल एका वेतामध्ये 3 हजार लिटर पर्यंतचे दूध देत आहे. Cow Farming

तर, ती कोणती आहे काय ?

आपल्याला असाच प्रश्न पडला असेल, की 3 हजार लिटर दूध देणारी गाय आहे तरी कोणती ? तर त्या गाईचे नाव आहे, “सहिवाल गाय” ही गाय लाल रंगाची व पशुपालक शेतकऱ्यांमध्ये फार मोठी लोकप्रिय गाय आहे. या गायची जात ही अधिक दूध उत्पादनामध्ये ओळखले जात आहे. आणि ह्या गाई दररोज 10 ते 15 लिटर प्रमाणे दूध देत असतात.

जर या गायची आपण योग्य वेळेवर काळजी घेतली, तर ती गाय तीस ते चाळीस लिटर पर्यंतचे दूध रोज देऊ शकते. असा दावा केला जातो. ही गाय एका वेतामध्ये कमीत कमी 2,500 ते 3,000 लिटर एवढे दूध देऊ शकते.

या गाईचे संगोपन प्रामुख्याने उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि हरियाणा या अशा राज्यांमध्येच केले जाते. आपल्या राज्यामध्ये गिर गाय व लाल सिंधी गाय यांसारख्या गाया दूध देण्यास सक्षम आहेत.

अशाच दूध व्यवसायाबद्दलच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment