Cotton Market News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी कापसाच्या कमी उत्पन्नाचा अंदाज असतानाही कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला मात्र आता महाराष्ट्रातील अनेक बाजार समितीमध्ये सध्या कापसाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली
यंदा कापसाचे उत्पादन कमी
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल, जाणून घ्या आजची 10 ग्रॅम सोन्याची किंमत
सध्या बाजार समितीत काय मिळते भाव?
छत्रपती संभाजी नगरच्या बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल सर्वसाधारण 8000 रुपये भाव मिळत आहे. तर बऱ्याच ठिकाणी 7000 रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळत आहे. एच 4 मध्यम स्टेपल कापसाला 7000 पेक्षा अधिक भाव मिळत असल्याने याची आवक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान आज सकाळच्या सत्रात 553 क्विंटल कापसाचे आवक झाले असून 7100 ते 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
आज बुलढाणा येथे लोकल कापसाची 423 क्विंटल झाली आहे. या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून, कमीत कमी 7000 तर जास्तीत जास्त 7800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. चंद्रपूर येथे लोकल कापसाची 130 क्विंटल असून येथे कापसाला सर्वसाधारण दर 7150 रुपये प्रति क्विंटल मिळत असून, कमीत कमी दर 6000 ते जास्तीत जास्त दर 7400 रुपये प्रति क्विंटन मिळत आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दूध अनुदानाचे 176.92 कोटी रुपये जमा! तुम्हाला मिळाले की नाही पहा येथे
काय आहे कापसाचा हमीभाव?
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कापसाच्या दोन मूळ वाहनाची आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव ठरवला आहे. त्यानुसार मध्यम स्टेपल व लॉंग स्टेपल कापसाचे आधारभूत किंमत 6080 व 6380 रुपये प्रति क्विंटल अशी आहे.
1 thought on “राज्यात कापसाला मिळतो हमीभावापेक्षा जास्त दर..! आवक कमी झाल्याचे परिणाम”