Cotton Market: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की कापसाचे भाव हे घसरले असून चांगल्या प्रकारच्या कापसाला भाव हा 6800 ते 7000 रुपये पर्यंत भेटतो. पण कापूसच्या उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे शेतकरी हे आर्थिक संकटामध्ये सापडला आहे.
या मान्सून नंतरच्या पावसाने बोंड आळीचा उत्कृष्टदर्जा व बोंडआळीचा प्रादुर्भाव हा देशातील शेतकऱ्यांच्या कापसावर चांगल्या प्रमाणावर पडला. यामुळे कापसावर याचा परिणाम फार प्रमाणावर झाला. फेब्रुवारी किंवा मार्च एंडिंग पर्यंत या कापसाच्या भावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता अभ्यास तज्ञांनी वर्तवली आहे. या काळामध्ये या कापसाचे भाव हे 7 हजार रुपयांच्या वर असतील असा विश्वास आपल्याला जाणकर यांनी व्यक्त केलेला आहे.
या नोव्हेंबर महिन्यामध्ये मान्सूनचा पाऊस झाल्यामुळे कापसाचा दर्जा हा खूपच जास्त घसरला होता. त्यामुळे कापसाच्या गुणवत्तेबरोबरच त्याचा दर्जा सुद्धा हा बदलला आहे. आणि कापसाला बाजारामध्ये कमी भाव मिळत आहे. तर या प्रक्रियेसाठी आपल्या चांगल्या प्रकारच्या कापसाला मागणी ही कायम असणार आहे.
आणि चांगल्या प्रकारचा कापूस हा उपलब्ध होत नसल्याने मार्च महिन्यापर्यंत या कापसाच्या भावामध्ये जास्त प्रमाणावर सुधारणा होईल, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. कापसाचा हा हमीभाव 7,020 रुपये असताना सुद्धा खुल्या बाजारामध्ये या कापसाच्या भावाला 2 हजार ते 6 हजार 800 रुपये एवढे मार्केट आहे. आणि मार्केटमध्ये जो कापूस भिजलेला आहे. त्या कापसाचा भाव सुद्धा हा दबावाखालीच राहिलेला आहे.
Cotton Market
शेतकऱ्यांकडून कापूस हा चांगला न भेटल्यामुळे उद्योजकांना जास्तच अडचणी निर्माण होत आहेत. मार्च महिन्यापर्यंत या कापसाच्या भावामध्ये वाढ होईल, असा विश्वास अभ्यासकांनी शेतकऱ्यांना व्यक्त केला आहे. कापसाच्या भावाला प्रति युनिट 55000 एवढा भाव मिळत आहे.
बाजारानुसार या मार्च महिन्यामध्ये कापसाचा भाव हा 61 हजार 400 रुपये प्रति युनिट पर्यंत जाण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. या कापसाच्या गाठी बरोबरच सरकीच्या भावात सुद्धा ही आता सुधारणा होत आहे. कापसाच्या भावात सुधारणा होण्याची माहिती मिळत असल्याने कापसाचा भाव 7 हजार रुपयांच्या वर असणार असून कापसाचे पणन या क्षेत्रातील तज्ञ आपल्याला सांगतात.
उद्योजकांना चांगल्या प्रकारचा कापूस न भेटल्याने सर्वच स्तरावर या कापसाची मागणी आता वाढणार आहे. यामुळे त्याचा भावावर परिणाम होईल. मार्च महिन्यामध्ये 7 हजार रुपयांच्या वर कापसाचा भाव राहील. आणि सरकीच्या भावातही वाढ होईल.
सरकीला 2600 ते 2700 प्रतिक्विंटल आणि 55 हजार ते 56 हजार रुपये प्रति ब्लॉक प्रमाणे भाव भेटत आहे, त्यामुळे रोज सकाळी 10 लाख क्विंटल आवक हे होत असते, फेब्रुवारी महिन्यामध्ये आवक कमी होण्याची अपेक्षा यामध्ये आहे. त्यामुळे या भावात सुधारणा होणार आहे. असे कापूस बाजार तज्ञ गोविंद वैराळे हे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा: महाराष्ट्रात तब्बल 17 हजार 471 पदांची होणार पोलीस भरती …! विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
1 thought on “Cotton Market: पांढऱ्या सोन्याचे दर आता सुधारण्याचे संकेत..! अभ्यासाकांनी वर्तवला अंदाज, पहा सविस्तर माहिती”