बांधकाम कामगार या योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

construction workers: नमस्कार मित्रांनो आपण यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी योजना व बांधकाम कामगार ऑनलाईन या योजनेची नोंदणी कशी करायची याबाबतची सविस्तर माहिती पाहून घेणार आहोत. बांधकाम व इतर बांधकाम हे सर्व मोठ्या असंघटीत वर्गामध्ये येत असतात. कामगाराच्या रोजगार व सेवाशक्तींचे नियमन करण्याच्या उद्देशाने तसेच सुरक्षा आरोग्य व कल्याणासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, भारत सरकारने इमारत व इतर कामगार कल्याणासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा 1996 ची तरतूद केली आहे. या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगार 2007 देखील मंजूर केला आहे.

उद्योगिनी या योजनेमधून काय लाभ मिळतो? कोणत्या महिला आहेत पात्र? अर्ज कसा करायचा ते घ्या जाणून!

या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार अधिनियम पारीत केला. या अधिसूचनेनुसार सुरुवातीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना पाच शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली.construction workers:

उद्योगिनी या योजनेमधून काय लाभ मिळतो? कोणत्या महिला आहेत पात्र? अर्ज कसा करायचा ते घ्या जाणून!

या योजनेचे उद्देश व उद्दिष्टे

  • ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.
  • बांधकाम कामगारापर्यंत पोहोचणे व त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
  • लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतीत सुलभपणा आणणे.
  • कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतीत सुटसुटीतपणा आणणे.
  • बाबाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
  • बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
  • कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता ही आणणे.
  • बांधकाम कामगाराच्या प्रत्येक कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
  • नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीचे प्रक्रिया ऑनलाईन करणे.

बांधकाम कामगार कल्याणकारी योजना या प्रामुख्याने चार आहेत जसे की, सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, आरोग्य विषयक योजना व आर्थिक योजना.

उद्योगिनी या योजनेमधून काय लाभ मिळतो? कोणत्या महिला आहेत पात्र? अर्ज कसा करायचा ते घ्या जाणून!

बांधकाम कामगार नोंदणी पात्रता निकष

  • 18 ते 60 या वर्षे वयोगटामधील बांधकाम कामगार
  • मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षाही जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार

नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

  • नोंदणी करण्यासाठी फॉर्म-V भरून खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
  • वयाचा पुरावा
  • 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा
  • ओळखपत्र पुरावा
  • पासपोर्टसाईज तीन फोटो
  • नोंदणी फी -25 रुपये व 5 वर्षासाठी वार्षिक वर्गणी 60 रुपये

एवढे कागदपत्र तुम्हाला या बांधकाम नोंदणी च्या योजनेसाठी लागणार आहेत. या कागदपत्रांच्या साह्याने तुम्ही अर्ज हा ऑनलाइन करू शकता.

अशाच योजनेच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा 👈

1 thought on “बांधकाम कामगार या योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती!”

Leave a Comment