Beneficiary Status: पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याच योजनेला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे व आता शेतकरी दुसऱ्या हप्त्याची वाट बघत आहे. आज आपण या लेख मध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्तेची माहिती देणार आहोत त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा.
पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाद्वारे चालवली जाणारी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. ही योजना 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली व ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली.
पी एम किसान योजनेच्या 16 हप्ते मध्ये वाढ :
या योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात होते. परंतु काल 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केले आहे त्या अर्थसंकल्पात आता शेतकऱ्यांना 6000 ऐवजी 9000रुपये दिले जाणार आहेत. व यावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 15 हप्ते देण्यात आले आहेत. व या योजनेचा 16 हप्ता देखील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती काही सूत्रांत द्वारे माहित झाली आहे.Beneficiary Status
नमो शेतकरी योजना :
पी एम किसन सन्मान निधी योजनेला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. ही देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेचे आधारावर सुरू करण्यात आली आहे व या योजनेची स्वरूप देखील पीएम किसान सन्मान निधी योजने प्रमाणे ठेवण्यात आले आहे.
नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना वार्षिकी सहा हजार रुपये रक्कम दिली जाते. या पैशाचे वितरण हे दोन हजार रुपयांचा एक हप्ता अशाप्रमाणे वर्षांमध्ये तीन हप्ते दिले जाते. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हप्ता जमा झाला आहे. व आता शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या विचारात आहेत.
नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या तारखेला होणार जमा :
काही माहितीनुसार असे समोर आले आहे की शिंदे सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे शेतकरी या योजनेस पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्राप्त होऊ शकतो. असा दावा काही मीडिया रिपोर्ट द्वारे सांगण्यात आला आहे.
1 thought on “Beneficiary Status: या दिवशी होणार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा , डायरेक्ट शेतकऱ्याचे बँक खाते मध्ये”