शेतात तार कुंपण करण्यासाठी सरकारने सुरू केली नवीन योजना..! सरकार देत आहे 90% अनुदान Agriculture News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News: महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना देत आहे. जेणेकरून शेतकऱ्याला शेती सोप्या पद्धतीने करता येणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकाचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपण देण्यात येणार आहे व यासाठी शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देखील मिळणार आहे.

शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये कुंपण गरजेचे झाले आहे. पीक आल्यानंतर वन्य प्राणी तसेच पाळीव प्राणी पिकाचे नुकसान करीत आहेत यापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेताला कुंपण करीत आहेत. पण शेतकऱ्यांना यासाठी चांगलाच खर्च येत आहे, पण आता शेतकऱ्यांना सरकार कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देणार आहे. Agriculture News

तार कुंपण योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती याचबरोबर आदिवासी शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. ज्या कारणाने आदिवासी शेतकऱ्यांची जमीन ही जंगली भागामध्ये असते व अशामध्ये वन्यप्राणी शेत पिकाचे नुकसान करीत आहेत. व इतर शेतकऱ्यांना देखील या योजनेअंतर्गत 50 टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे.

तार कुंपण योजनेसाठी पात्रता :-

  • ज्या लाभार्थीच्या नावावर दोन ते तीन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आहे असे शेतकऱ्यांना 60% पर्यंत अनुदान मिळणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांकडे तीन ते पाच हेक्टर जमीन असणार आहे अशा शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
  • ज्या शेतकऱ्याकडे पाच पेक्षा जास्त जमीन असणार आहे अशा शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी नियम व अटी :-

  • ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणार आहे तो शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असली पाहिजे.
  • शेतकऱ्याच्या शेतीमध्ये कोणतेही प्रकारचे न्यायालयीन खटला नसावा.
  • लाभार्थी शेतकऱ्याकडे ना हरकत प्रमाणपत्र असावे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

  • जमिनीचा सातबारा उतारा
  • लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • लाभार्थी शेतकऱ्यांचा जातीचा दाखला
  • ना हरकत पत्र
  • 8अ उतारा

असा करा अर्ज :-

तार कंपनी होण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना महाडीबीटीचे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरावा लागणार आहे. किंवा तुम्ही तुमच्या गावांमध्ये महा-ई-सेवा केंद्र मध्ये हा अर्ज भरू शकणार आहात.

महाडीबीटी चे ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा :- मोफत बोअरिंग योजना: शेतकऱ्यांच्या शेतात मोफत बोअरिंग बसवले जाईल, येथे अर्ज करा

1 thought on “शेतात तार कुंपण करण्यासाठी सरकारने सुरू केली नवीन योजना..! सरकार देत आहे 90% अनुदान Agriculture News”

Leave a Comment